PCMC: उपयोगकर्ता शुल्क भरण्यास नागरिकांचा प्रतिसाद, साडेचार कोटी शुल्क जमा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेने सन 2023-24 या आर्थिक (PCMC) वर्षांपासून कचरा संकलन सेवेसाठी मिळकतधारकांकडून उपयोगकर्ता शुल्क वसुलीस सुरुवात केली आहे. घरटी दरमहा 60 रुपये व व्यावसायिक आस्थापना असलेल्या मिळकतींना आकारमानानुसार शुल्क आहे. या शुल्कापोटी आतापर्यंत 4 कोटी 67 लाख रुपये महापालिका तिजोरीत जमा झाले आहेत.

एप्रिल महिन्याच्या 24 दिवसांत मिळकतकर बिलापोटी एकूण 44 कोटी रुपये करसंकलन विभागाकडे जमा झाले आहेत. 39 हजार मिळकत धारकांनी वर्षाचे कर भरून सवलतीचा लाभ घेतला आहे. शहरातील 5 लाख 98 हजार मिळकतींची नोंद पालिकेच्या करसंकलन विभागाकडे आहे. यंदा 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 या आर्थिक वर्षात 1 हजार कोटी जमा करण्याचे उद्दिष्ट करसंकलन विभागास देण्यात आले आहे. त्यानुसार, मिळकतकर बिलांचे वाटप करण्यास विभागाने सुरुवात केली आहे. महिला बचत गटांच्या मार्फत यंदा बिलाचे घरोघरी वितरण केले जात आहे.

Indrayani River : महाराष्ट्र प्रदूषण मंडळ जलप्रदूषणावर गंभीर आहे का? उपोषणाचा चौथा दिवस!

शहरातील 50 टक्के मिळकतधारक स्वतःहून वेळेवर मिळकतकर भरून विविध सवलतींचा (PCMC) लाभ घेतात. एप्रिल महिन्यात 24 तारखेपर्यंत तब्बल 39 हजार मिळकतधारकांनी बिले भरली आहेत. त्यात 36 हजार 910 निवासी मिळकती, 1 हजार 492 बिगरनिवासी, 105 औद्योगिक, 361 मिश्र, मोकळ्या जागा 101 आहेत. त्यात सर्वाधिक 32 हजार 924 जणांनी ऑनलाइन 35 कोटी 68 लाखांचा मिळकतकर भरला आहे. चार हजार 380 जणांनी रोखीने, 847 जणांनी धनादेश व 7 जणांनी डीडीने बिल भरले असल्याची माहिती कर संकलन व कर आकारणी विभागाचे सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.