Indrayani River : ‘प्रदूषण नियंत्रण मंडळ जलप्रदूषणावर गंभीर आहे का’; उपोषणाचा चौथा दिवस!

एमपीसी न्यूज : आळंदी येथील इंद्रायणी माता प्रदूषण मुक्तीसाठी (Indrayani River) असलेल्या उपोषणास आजचा चौथा दिवस आहे. पवित्र इंद्रायणी नदीमध्ये इंद्रायणी नदी काठच्या गावातून इंद्रायणी नदीत मैलामिश्रित सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता ते मैलामिश्रित सांडपाणी तसेच इंद्रायणी नदीपात्रात सोडतात. तसेच नदी काठच्या गावातील कारखानदार सुद्धा कारखान्यातील रसायनयुक्त सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता ते सांडपाणी थेट इंद्रायणी नदी पात्रात सोडत असल्याने इंद्रायणी नदीमध्ये गेल्या काही वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात जल प्रदूषण वाढले आहे.

नदीमधील हे प्रदूषण वाढल्याने जलचर जीवांचे जीव धोक्यात येत आहेत. या प्रदूषणामुळे इंद्रायणी नदीमध्ये मृत मासे सुद्धा आढळून आले होते. तसेच इंद्रायणी नदीपात्रातील पाणी शेतपंपाद्वारे शेतीला नेले जाते. ते प्रदूषित पाणी विविध पिकांना दिले जाते. आणि त्या प्रदूषित पाण्याचा पिकांवर दुरोगामी परिणाम होतो. ती पिके माणसांसह जनावरांच्या आरोग्यासाठी खाणे अपायकारक ठरत आहेत. या नदीपात्राच्या प्रदूषित पाण्यामुळे जवळपास असणाऱ्या विहिरी बोर यांच्या पाण्यामध्ये परिणाम दिसून येतो. ते पाणी पिल्याने सर्वांच्याच आरोग्यास धोका निर्माण होत आहे.

Lonavala : शिवदुर्ग मित्र लोणावळा तर्फे आयोजित बोल्डरींग चॅम्पियनशिप स्पर्धा उत्साहात संपन्न

या नदीमधील जल प्रदूषण मुक्तीसाठी हे उपोषण चालू आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ते जलप्रदूषण रोखण्यासाठी ठोस भूमिका घेत कृती करावी. संबंधित आधिकारी यांनी जलप्रदूषण करणाऱ्यां कारवाई करावी. उगम ते संगम सर्व गावांमध्ये एस टी पी प्लँट उभारावा. अशा प्रमुख मागण्यामध्ये या मागण्यांचा ही समावेश आहे.

इंद्रायणी माता प्रदूषण मुक्तीसाठी विविध संस्थांनी, पाठींबाचे पत्र त्यांना दिले (Indrayani River) आहे. सामान्य अनेक (एक हजारांच्या पुढे स्वाक्षरीचा टप्पा पूर्ण) नागरिक सुद्धा स्वाक्षरी करत या उपोषणास पाठींबा देत आहे. या उपोषणाबाबत वृत्तपत्र व मीडिया व्हिडिओ न्यूजद्वारे सुद्धा वृत्त प्रसारीत होऊन सुद्धा अजूनही कोणत्याही प्रशासन अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया दिलेली नाही.

कोणताही प्रतिनिधी त्यांच्याद्वारे त्यासंदर्भात विचार विनिमय करून उपाययोजना तिथे कराव्यात यासाठी तेथे पाठवण्यात आलेला दिसून येत नाही. यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ जलप्रदूषणा बाबत गंभीर आहे का, असा सवाल येथील नागरिकांनी केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.