Lonavala : शिवदुर्ग मित्र लोणावळा तर्फे आयोजित बोल्डरींग चॅम्पियनशिप स्पर्धा उत्साहात संपन्न

एमपीसी न्यूज – शिवदुर्ग मित्र लोणावळा तर्फे (Lonavala) बोल्डरींग चॅम्पियनशिप 2023 या स्पर्धेचे लोणावळा येथे आयोजित करण्यात आली होती. दिनांक 29 एप्रिल व 30 एप्रिल रोजी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या दरम्यानच हैदराबादमध्ये देखील अशाच स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याने येथे स्पर्धक हजेरी लावतील का? ही शंका निर्माण झाली. परंतु, तीन दिवसाआधीच 100 स्पर्धक पूर्ण होऊन या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.‌

या स्पर्धेत महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरच्या स्पर्धकांनी देखील सहभाग घेतला. सर्व स्पर्धकांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था सुद्धा करण्यात आली होती.

लोणावळा उपविभागीय पोलिस अधिकारी सत्य साई कार्तिक यांनी स्पर्धेचे उद्घाटन केले. यशवंती हायकर्स खोपोलीचे पद्माकर गायकवाड , कांचनजंगा मांऊटेनियरींगचे दिलीप लागु , एमएसएचे नंदु चव्हाण, ‘पीक’चे मुफी लोखंडवाला, अभिजित बर्मन, ठाण्याचे अद्वेत मळेकर , धनाजी लांडगे, रणजीत शिंदे, सुजित तांबे , अतिन साठे यांनी स्पर्धेला हजेरी लावून स्पर्धकांना प्रोत्साहन दिले.

शिवदुर्ग स्वंयसेवकांबरोबरच पालक सुद्धा स्पर्धेसाठी धावपळ व मदत करत होते. 6 ते 9 वर्ष मुलींमध्ये रितिशा ब्रम्हे ही प्रथम आली तर मीरा चौधरी आणि मुक्ता तळवलकर या द्वितीय व तृतीय आल्या. 6 ते 9 वर्ष मुलांमध्ये अनय पिंगळे प्रथम आला तर अद्वैत साठे आणि सत्यजित नढे द्वितीय व तृतीय आले. या गटात प्रथम बक्षीस हे पाच हजार रुपयांचे होते.

वयोगट 10 ते 13 मुली यांच्यामध्ये केया रेवनकर ही पहिली आली तर अनहिता अरोरा आणि काव्या बोरलीकर या दुसऱ्या व तिसऱ्या आल्या. वयोगट 10 ते 13 मुले यांच्यामध्ये रुद्र करंदीकर हा पहिला आला तर आयुष पवार आणि ध्रुव साठे हे दुसरे आणि तिसरे आले.

वयोगट 14 ते 16 वर्ष मुलींमध्ये अभिपशा रॉय ही विजेती ठरली तर अन्वी जैन आणि गिरिजा लांडगे या उपविजेत्या ठरल्या. वयोगट 14 ते 16 वर्ष मुलांमध्ये श्रीहान मराठे हा विजेता ठरला तर आयुष वर्तक आणि सोलिन नेवे हे उपविजेता ठरले.

खुला गट मुलींमध्ये सिद्धी मनेरीकर, श्रृती शिंदे आणि कृष्णा पटेल (Lonavala) अश्या पहिल्या तिघांची नावे आहेत तर खुला गट मुलांमध्ये साहिल खान, अजीज शेख व अर्चित मीटबावकर हे पहिल्या तीनमध्ये आले. वरील गटांमध्ये पहिले बक्षीस हे दहा हजार असे होते.

दि हिमालयीन क्लबच्या वतीने एक वर्ष हिमालयीन क्लबची मेंबरशीप आणि चाॅक बॅग, कॅराबिनर तसेच डीसेंडर विजेत्यांना देण्यात आले. दिपक क्लायबींग इन्स्टिट्यूट व ऍडटायर यांच्या कडून विजेत्यांना वाॅटर बाॅटल आणि वुडन होल्ड दिले गेले.

लोणावळा शहर पोलिस निरीक्षक सीताराम डुबल, जेष्ठ गिर्यारोहक कपिलेश्वर रत्नाकर, विनीता मुनी, दिव्येश मुनी, राजेश गाडगीळ, राजेंद्र शिंदे, सुरेश दादा गिद, वसुंधरा नितीन दुर्गे, देविदास कडू यांच्या हस्ते पार पडला. संपूर्ण स्पर्धेसाठी स्पोर्टस क्लायंबिंग फेडरेशन ऑफ इंडिया, स्पोर्टस क्लायंबिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र तसेच प्राजक्ता घोडे यांनी ज्युरी प्रेसिडेंट म्हणून काम पाहिले.

Pune : पुण्यात प्रतिकात्मक कुस्ती लावून ब्रिजभुषण शरण सिंह यांचा निषेध

तसेच श्रीपाद सपकाळ, किशोर चव्हाण, नवनाथ पवार, प्रवीण सावंत यांनी पंच म्हणून काम पाहिले. रुट सेटर म्हणून राहुल पेंडसे, दिपक पवार, ध्रुव विश्वासराव यांनी काम पाहिले. कृष्णा ढोकळे, समिरन कोल्हे, वर्षा खाटींग, हनुमान खाटींग यांनी शिवदुर्ग टीम बरोबर मदतनीस म्हणून काम पाहिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.