Pune : पुण्यात प्रतिकात्मक कुस्ती लावून ब्रिजभूषण सिंह यांचा निषेध

एमपीसी न्यूज : भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष भाजपचे नेते खासदार ब्रिजभूषण शरण सिंह (Pune) यांच्यावर महिला खेळाडूंनी लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. या विरोधात मागील 12 दिवसांपासून खेळाडू जंतरमंतरवर आंदोलनाला बसले आहेत. त्याच दरम्यान बुधवारी रात्री खेळाडू आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्याची घटना घडली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील काँग्रेस पक्षाचे नेते संजय बालगुडे यांनी मुलांची प्रतिकात्मक कुस्ती लावून ब्रिजभूषण सिंह यांचा निषेध नोंदविला. तर,  आंदोलनकर्त्यां महिला खेळाडूंना पाठिंबा देखील दर्शविला.

यावेळी संजय बालगुडे म्हणाले की, कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावर महिला खेळाडूंनी लैंगिक शोषणाचा आरोप केला असून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. या मागणीसाठी 12 दिवसापासून खेळाडू ठिय्या आंदोलन करीत आहेत. ज्या महिला खेळाडूंनी देशासाठी पदके जिंकली आहेत. त्या खेळाडूंना अत्याचाराच्या घटनेला सामोरे जावे लागले आहे.

 

Maharashtra News : सुदानमध्ये अडकलेले आणखी 34 महाराष्ट्रीयन परतले भारतात

 

ही बाब निषेधार्थ असून ब्रिजभूषण सिंह यांच्यावर केंद्र सरकारने (Pune) कारवाई केली पाहिजे. त्या मागणीसाठी आज आम्ही कुस्ती खेळाडूची प्रतिकात्मक कुस्ती लावून निषेध नोंदविला आहे. या आंदोलनाची दखल सरकारने न घेतल्यास भविष्यात तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.