Pimpri : जन सामान्यांच्या आशा,आकांशा स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांनी पूर्ण केल्या – शंकर जगताप  

एमपीसी न्यूज –  भारताप्रती असलेले निस्वार्थ समर्पण व पन्नास वर्षाहून ( Pimpri) अधिक काळ देशासाठी दिलेल्या निस्पृह सेवेबद्दल स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी नावाप्रमाणेच एक ज्येष्ठ भारतीय नेते, निष्णात राजकारणी, निस्पृह सामाजिक कार्यकर्ते, बलवान वक्ते, कवी, साहित्यिक, पत्रकार व खऱ्या अर्थाने बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. जनसामान्यांच्या आशा आकांक्षा स्वर्गीय वाजपेयी यांनी पूर्ण केल्या. त्यांच्या कार्यातून आजही त्यांची राष्ट्राप्रती असलेली निष्ठा प्रतीत होते, असे मत भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी व्यक्त केले.

देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या 99 व्या जयंती निम्मित मोरवाडी, पिंपरी येथील कार्यालयात भाजप पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा )च्या वतीने शहराध्यक्ष जगताप यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. प्रदेश उपाध्यक्ष अमर साबळे, आमदार उमा खापरे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस अनुप मोरे, युवा मोर्चा प्रदेश चिटणीस तेजस्विनी कदम, माजी महापौर उषा ढोरे, वरिष्ठ उपाध्यक्ष राजू दुर्गे, सरचिटणीस नामदेव ढाके, संजय मंगोडेकर,

Pune : धनंजय मुंडेंना कोरोनाची लागण

मंडल अध्यक्ष प्रसाद कस्पटे, संदीप नखाते, निलेश अष्टेकर, संतोष तापकीर, ओबीसी मोर्चा प्रदेश चिटणीस मनोज ब्राह्मणकर, अनु.जाती मोर्चा अध्यक्ष भीमा बोबडे, माजी नगरसेवक मोरेश्वर शेडगे, कायदा सेल संयोजक गोरक्षनाथ झोळ, महिला आघाडी सरचिटणीस वैशाली खाडे, उपाध्यक्ष आशा काळे, चिटणीस जयश्री जायभाय, सचिन काळभोर, वैद्यकिय सेल संयोजक प्रताप सोमवंशी, व्यापारी आघाडी सरचिटणीस सतपाल गोयल, सुधीर निंबर्गीकर, अलका मकवाना, निकिता गोसावी, भूषण जोशी, प्रीतेश पाटील, जयश्री नवगिरे, देविदास पाटील, नेताजी शिंदे, कैलास सानप, पराग जोशी, संजय परळीकर यांच्यासह विविध आघाड्या व प्रकोष्ठचे पदाधिकारी उपस्थित होते.

शहराध्यक्ष शंकर जगताप म्हणाले पुढे कि, महिला सबलीकरण व सामाजिक समानतेचे खंबीर समर्थक असलेले स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्व देशांमध्ये एक दूरदर्शी, विकसित आणि मजबूत राष्ट्र म्हणून बघू इच्छित होते. पाच वर्षांची ऐतिहासिक संस्कृती लाभलेल्या व आगामी एक वर्षांमध्ये येणारी आव्हाने पेलण्यास तयार असलेल्या भारत देशाचे प्रतिनिधित्व त्यांनी केले.

स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंती दिनी 25 डिसेंबर रोजी देशभरात “सुशासन दिन” म्हणून आजचा दिवस संस्मरणीय बनविण्यात येत आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सुशासन दिन होत आहे. पूज्य अटलजींच्या गुणांचे स्मरण करण्यासाठी शहरात प्रत्येक बूथवर कार्यकर्ते रचनात्मक कार्यक्रम आयोजित केले आहे. केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या गरीब व शेतकरी कल्याणकारी योजनांचे यश व सुशासन याबाबत लाभार्थ्यांना माहिती देण्यात येत असल्याचे त्यांनी ( Pimpri) सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.