Pimpri Udyog : उद्योजकांच्या समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करणार – चंद्रकांत साळुंखे

एमपीसी न्यूज –  पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri Udyog) ऑटोमोबाईल, आयटी, बायोटेक असे अनेक उद्योग झपाट्याने वाढत असून सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगाला (एमएसएमई) बळ देण्यासाठी चेंबर प्रयत्नशील आहे. उद्योजकांच्या प्रगती आणि विकासासाठी त्याचप्रमाणे त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्य व केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला जाईल, चेंबरचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत साळुंखे यांनी व्यावसायिकांना सांगितले.

एसएमई चेंबर ऑफ इंडिया ‘फेडरेशन ऑफ इंडियन एसएमई असोसिएशन’ आणि ‘महाराष्ट्र इंडस्ट्री डेव्हलपमेंट असोसिएशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एसएमई इंडस्ट्रीज ॲण्ड एक्सपोर्टर्स समीटचे’ आयोजन पिंपरी-चिंचवडमध्ये करण्यात आले होते त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी डॉ. राजेंद्र जगदाळे, प्रभाकर साळुंखे, श्रीकांत बडवे, महेश पाठक, महेश कुमार साळुंखे,  साक्षी कुलकर्णी, डॉ. दीप्ती पाटील,  प्रज्ञा पाटील आदी उपस्थित होते.

Shiv Sena Symbol : शिंदे गटाचाही त्रिशूल आणि उगवत्या सूर्यावर दावा; आयोगाने दोन्ही चिन्ह केले बाद

आर्थिक सल्लागारावर विसंबून न राहता आपला उद्योग यशाच्या शिखरावर घेऊन जायचे असल्यास स्वत:ची बँलन्सशीट व बिझनेस प्लान वाचायला व समजायला प्रथम शिकले पाहिजे. सायन्स आणि टेक्नॉलॉजी पार्कच्या माध्यमातून नविन प्रोडक्ट डेव्हलप करून त्यांची निर्मिती करण्यासाठी, संशोधन करण्यासाठी 10 लाखापासून 1 करोड रूपयापर्यंत अनुदान देखील देण्यात येते अशी माहिती सायन्स आणि टेक्नॉलॉजी पार्कचे संचालक डॉ. राजेंद्र जगदाळे यांनी दिली.

देशातील कोणत्याही रिसर्च लॅब मध्ये सायन्स आणि टेक्नॉलॉजी (Pimpri Udyog) पार्कच्या माध्यमातून आपण आपल्या उत्पादनाची चाचणी करून घेवू शकतो. भारताचा इतर देशांशी असलेल्या द्विपक्षीय, बहुउद्देशीय करार उद्योजकांनी जाणुन घेवून त्याचा फायदा उद्योग वाढीसाठी करावा असे आवाहनही त्यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.