Sahakarnagar Crime : न्यूड व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याने तरुणाची आत्महत्या

एमपीसी न्यूज : व्हाट्सअपवरून एका (Sahakarnagar Crime) अनोळखी महिलेसोबत झालेल्या ओळखीतून न्यूड व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी येऊ लागल्याने एका तरुणाने आत्महत्या केली आहे. अमोल राजू गायकवाड (वय 22) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. सहकार नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील धनकवडी परिसरात 30 सप्टेंबर रोजी हा प्रकार घडला. सहकारनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत तरुणाच्या भावाने याप्रकरणी तक्रार दिली आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, मयत राजू गायकवाड याची व्हाट्सअपवरून एका अनोळखी महिलेसोबत ओळख झाली होती. त्या अनोळखी क्रमांकावर राजू गायकवाड यांनी वेळोवेळी चॅटिंग केले होते. दरम्यान, समोरील अनोळखी व्यक्तीने राजू गायकवाड याचा न्यूड व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर अपलोड करण्याची भीती दाखवली. त्यानंतर वेळोवेळी त्याच्याकडून फोन पे वरून साडेचार हजार रुपये उकळले.
दरम्यान, आणखी पैशाची मागणी होत असल्याने (Sahakarnagar Crime) राजू गायकवाड यांनी व्हाट्सअपवर ‘मे सुसाईड कर रहा हू असा मेसेज पाठवला होता. त्यावर समोरील व्यक्तीने करो, फिर व्हिडिओ लाईव्ह करता हु असे म्हणून पुन्हा त्याच्याकडे पैशाची मागणी केली होती. या सर्व त्रासाला कंटाळून राजू गायकवाड यांनी अखेर राहत्या घरात आत्महत्या केली. सहकारनगर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.