Pune :पुण्यातील संगणक अभियंता तरुणीची सायबर चोरट्याकडून फसवणूक

विवाहाचे आमिष दाखवून तरुणीकडून लुटले तब्बल 4० लाख रुपये

एमपीसी न्यूज : एका संगणक अभियंता तरुणीची विवाह संकेतस्थळावर राजेश शर्मा नामक व्यक्तीने विश्वास संपादन करून तब्बल 40 लाख रुपयांची घोर फसवणूक केली आहे. याप्रकरणी  फिर्यादीने मुंढवा (Pune) पोलिस ठाण्यात तक्रार दिलेली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  फिर्यादी तरुणीने एका विवाहविषयक संकेतस्थळावर नाव नोंदणी केली होती. यावेळी संकेतस्थळावर तिची ओळख राजेश शर्मा या व्यक्तीशी झाली. मी परदेशात एका मोठ्या कंपनीत अधिकारी आहे असे राजेश शर्मा नावाच्या व्यक्तीने तिला बतावणी केली.  फिर्यादी आणि राजेश शर्मा यांच्यामध्ये ऑनलाईन संभाषण सुरु झाले आणि ह्या संभाषणातून दोघांनी लवकरच लग्न करण्याचा निर्णय घेतला.

Chinchwad : सायबर चोरट्यांच्या हाती ‘इझी मनी’चा गळ

Pune : देशातील प्रत्येक व्यक्ती सायबर सुशिक्षित असणे गरजेचे ;सायबर तज्ज्ञांचे मत

आरोपीने मी लवकरच भारतात येऊन एक व्यवसाय सुरू करणार असल्याचे तरुणीला सांगितले आणि तिला त्याने एक बनावट विमान प्रवासाचे तिकीट तिला पाठविले.मी दिल्ली विमानतळावर पोहोचलो असून माझी परदेशी चलनाबाबत कसून चौकशी करण्यात येत असल्याचे त्याने या तरुणीला फोन करून सांगितले. मला दिल्ली विमान तळावरून बाहेर पडण्यासाठी काही शुल्क या ठिकाणी असलेल्यांना द्यावा लागेल असे सांगून त्याने तरुणीला बँक खात्यात त्वरीत पैसे जमा कर असं सांगितलं.

त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन या तरुणीने त्याच्या बँक खात्यात ४० लाख ५० हजार रुपये जमा केले.पैसे जमा केल्यानंतर आरोपीने त्याचा मोबाइल क्रमांक बंद केला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने पोलीस ठाण्यात धाव घेतली. मुंढवा पोलिस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.