Cyber Crime : पोलीस असल्याचे सांगत लुटले तब्बल 103 कोटी रुपये 

एमपीसी न्यूज –  सायबर क्राईमच्या माध्यमातून  आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत ( Cyber Crime) असल्याचे दिसत आहेत. यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलीस बनून सायबर गुन्हेगारांनी तब्बल 103 कोटी रुपयांची लूट केल्याची घटना समोर  आली आहे. ही घटना  मुजफ्फरपुर येथे घडली.

या प्रकरणी मुजफ्फरपुर सायबर विभागाच्या डीएसपी सीमा देवी यांच्या नेतृत्वाखाली एक टीम तयार करण्यात आली होती. या टीमने छापे टाकून मोतिहारी, दरभंगा आणि मुझफ्फरपूर येथून अर्धा डझन सायबर गुन्हेगारांना अटक केली. अंकित कुमार, दीपक कुमार, रौशन कुमार (सर्व रा. दरभंगा), अरशद आलम, अमजद आलम (दोन्ही रा. मोतिहारी जिल्हा) आणि मुजफ्फरपुरच्या साहेबगंज येथील रहिवासी जितेंद्र कुमार अशी अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींची नावे आहेत.या सर्वांचे संबंध परदेशात जोडले गेले आहे.

Chinchwad : पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून अडीच महिन्यात 57 जुगार अड्ड्यांवर कारवाई; 352 जणांना अटक

या सायबर गुन्हेगारांनी आतापर्यंत विविध लोकांची तब्बल 103 कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केली आहे. त्यांनी सर्वाधिक महिलांना लक्ष केले. हे सर्वजण त्यांना पोलीस म्हणून कॉल करायचे आणि त्यांना धमकावून त्यांच्याकडून पैसे उकळायचे. पोलिसांचे नाव सांगितल्याने बहुतांश लोकांनी पोलीस ठाण्यात तक्रारही केली नाही. मात्र, यावेळी पीडितेच्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी सापळा रचला आणि या टोळीतील अनेक गुन्हेगारांना पकडले. आता त्यांची सखोल चौकशी करण्यात येत ( Cyber Crime) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.