Chinchwad : पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून अडीच महिन्यात 57 जुगार अड्ड्यांवर कारवाई; 352 जणांना अटक

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सुरु असलेल्या अवैध धंद्यांवर (Chinchwad) सातत्याने कारवाई केली जात आहे. जानेवारी पासून आजवर गेल्या अडीच महिन्यांच्या कालावधीत आयुक्तालयाच्या हद्दीत 57 जुगार अड्ड्यांवर कारवाया करण्यात आल्या आहेत. या कारवायांमधून अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाहीत, असा सज्जड दम पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दिला आहे.

जानेवारी ते 15 मार्च या कालावधीत पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आयुक्तालयाच्या हद्दीत 57 जुगार आणि मटका अड्ड्यांवर कारवाई केली आहे. तसेच या प्रकरणांमध्ये 352 गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. कारवाई केलेल्या प्रकरणांमध्ये आतापर्यंत 21 लाख 36 हजार 881 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Nigdi : महिला दिनानिमित्त “जल्लोष तारकांचा “

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कारवायांना वेग

लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात 1 हजार 854 मतदान केंद्र असून त्यात प्रामुख्याने मावळ व शिरुर लोकसभा मतदारसंघाचे क्षेत्र आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांकडून कारवायांचे सत्र सुरु झाले आहे.

निवडणूक कालावधीत उपद्रव घालणाऱ्या संभाव्य गुन्हेगारांची कुंडली पोलिसांनी काढली आहे. अशा प्रत्येकावर पोलिसांनी नजर ठेवली आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने 1 डिसेंबर 2023 पासून आतार्यंत 2 हजार 500 पेक्षा अधिक आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर एमपीडीएअंतर्गत 13, मोक्का कायद्याअंतर्गत 18 संघटनांवर कारवाई करुन 99 आरोपींना अटक, तसेच 95 आरोपींना हद्दपार, शस्त्र जमा करणे अशा कारवाया करण्यात आल्या आहेत.

आयुक्तालयाच्या हद्दीत सुरू असणाऱ्या अवैध धंद्यांवर कारवाया केल्या जात आहेत. नागरिकांनी अवैध धंद्यांबाबत नियंत्रण कक्षातील व्हाटस अप नंबर (9529691966) वर माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले (Chinchwad) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.