Nigdi : महिला दिनानिमित्त “जल्लोष तारकांचा “

एमपीसी न्यूज – निगडी येथे महिला दिना निमित्त खास (Nigdi) महिलांसाठी “जल्लोष तारकांचा “हा कार्यक्रम सादर झाला. यामध्ये दर्जेदार लावण्या सादर करण्यात आल्या.

शिवसेना महिला शहर संघटिका सरिता अरुण साने यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. महिलांना मोकळेपणाने आपल्या लोककलेचा आस्वाद घेता यावा म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. महिलांनी त्याला प्रचंड प्रतिसाद दिला आणि कार्यक्रमाचा पुरेपूर आस्वाद घेतला. या प्रसंगी खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते  महिलांचा सत्कार झाला.

Pimpri Chinchwad ST News : अष्टविनायक दर्शन सेवेतून पिंपरी चिंचवड आगाराला पाच लाख 34 हजारांचे उत्पन्न

वयाच्या 75 व्या वर्षी सुरुवात करून 80 व्या वर्षा पर्यंत तब्बल सात वेळा वरिष्ठ गटात मॅरेथॉन जिंकणाऱ्या जयश्री टेमकर,मेस चालवून आपल्या घराचा चरितार्थ चालववणार्या आश्विनी बागुल,तोरणा गड ते भक्ती शक्ती अशी दौड समूहाने करून आम्ही जिजाऊ च्या लेकी असे अभिमानाने सांगणाऱ्या माधुरी आव्हाड, आपल्या दोन्ही मुलांना साथीदाराशिवाय समर्थपणे वाढवण्यासाठी काबाडकष्ट करणारी रुक्मिणी,

कोणतेही प्रशिक्षण न घेता केवळ चिकाटी आणि मेहनत याच्या बळावर संगणक आणि वाहन चालवणे शिकल्या आशा ताई रेंगे या सर्व महिलांचा सत्कार  खासदार बारणे यांच्या हस्ते झाला.”महिलांनी ठरवले तर त्या कोणतेही आव्हान सहजपणे पार करू शकतात आणि त्यांनी हे अनेकवेळा सिद्ध केले आहे” असे गौरव उद्गार खासदार बारणे यांनी या प्रसंगी काढले. सत्कार समारंभाचे सूत्रसंचालन ज्योती कानेटकर (Nigdi)  यांनी केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.