Pimpri Chinchwad ST News : अष्टविनायक दर्शन सेवेतून पिंपरी चिंचवड आगाराला पाच लाख 34 हजारांचे उत्पन्न

एमपीसी न्यूज – अष्टविनायक दर्शन सेवा एसटी महामंडळाकडून ( Pimpri Chinchwad ST News) सुरू करण्यात आली आहे. या सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मागील वर्षभरात पिंपरी चिंचवड आगाराला अष्टविनायक दर्शन सेवेतून पाच लाख 34 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. तर पुणे विभागाला 42 लाख 22 हजारांचे उत्पन्न मिळाले आहे.

अष्टविनायकांमधील सहा मंदिरे पुणे जिल्ह्यात आहेत तर दोन मंदिरे रायगड जिल्ह्यात आहेत. दोन दिवसांमध्ये अष्टविनायक यात्रा संपन्न होते. त्यामुळे पर्यटन, देवदर्शन, नवस अशा विविध कारणांसाठी भाविक अष्टविनायकाची यात्रा करतात. दररोज अष्टविनायक मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी असते. भाविकांची मागणी लक्षात घेत एसटी महामंडळाकडून अष्टविनायक यात्रा बसचे नियोजन करण्यात आले आहे.

Vadgaon Maval : वडगाव मावळ शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी अनंता कुडे

मागील वर्षभरात सुमारे 436 अष्टविनायक दर्शन यात्रा विशेष बस सोडण्यात आल्या आहेत. राजगुरुनगर, नारायणगाव, शिरूर, पिंपरी चिंचवड, सासवड, बारामती शहर व एमआयडीसी आगारातून अष्टविनायक दर्शन यात्रा विशेष बस सोडण्यात येतात. राजगुरूनगर आगारातून सर्वाधिक 9 लाख 62 हजार रुपये उत्पन्न मिळाले आहे.

सासवड आगाराला 8 लाख 34 हजार 265, बारामती एमआयडीसी आगाराला 8 लाख 14 हजार 59 रुपये, बारामती शहर आगाराला 6 लाख 79 हजार 388 रुपये, पिंपरी चिंचवड आगाराला 5 लाख 34 हजार 186 रुपये, नारायणगाव आगाराला 3 लाख 73 हजार 370 रुपये आणि शिरूर आगाराला 24 हजार 420 रुपये उत्पन्न मिळाले आहे.

पिंपरी चिंचवड आगार प्रमुख संजय वाळवे ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना म्हणाले, “प्रत्येक महिन्यातील चतुर्थीच्या आदल्या दिवशी वल्लभनगर आगारातून अष्टविनायक यात्रा जादा बस सोडली जाते. प्रवाशांची गर्दी पाहता अनेक वेळेला दोन बसचे नियोजन केले जाते. प्रत्येक महिन्यात प्रवासी या सेवेला चांगला प्रतिसाद देत आहेत. या व्यतिरिक्त दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर साडेतीन शक्तीपीठ यात्रा ज्यादा बस ( Pimpri Chinchwad ST News) देखील सोडली जाते.”

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.