Lonikand : सायबर फ्रॉड मधील तिघांचे पैसे पोलिसांनी केले परत

एमपीसी न्यूज – सायबर फ्रॉडमध्ये (Lonikand) फसवणूक झालेल्या तिघांचे पैसे लोणीकंद पोलीस ठाण्याच्या सायबर विभागाच्या पाठपुराव्यामुळे त्यांना परत मिळाले. तिघांची मिळून एक लाख रुपयांची फसवणूक झाली होती.

एकाची 89 हजार तर इतर दोन जणांची प्रत्येकी चार हजार व सहा हजार पाचशे रुपयांची फसवणूक झाली होती. त्यांनी याबाबत लोणीकंद सायबर विभागाकडे तक्रार केली होती. त्यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे. सायबर विभागाने त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन त्वरित कार्यवाही केली.

Ravet : कत्तलीसाठी गायी घेऊन जाणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

पोलिसांनी संबंधित मर्चंट कडे वारंवार पाठपुरवठा केला. त्यानंतर तक्रार दारांचे पैसे त्यांच्या खात्यात जमा झाले. लोणीकंदचे (Lonikand) वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काइंगडे, पोलीस निरक्षक (गुन्हे) मारुती पोलीस निरीक्षक (गुन्हे) सीमा ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर तपास पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सुरज गोरे, समीर पिलाणे, सागर पाटील, गणेश डोंगरे, कीर्ती नरवडे, कोमल भोसले, वृंदावणी चव्हाण यांनी ही कामगिरी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.