Ravet : कत्तलीसाठी गायी घेऊन जाणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – कत्तलीसाठी गायी घेऊन (Ravet) जाणाऱ्या दोघांवर रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार बुधवारी (दि.27) सकाळी पुनावळे येथील अंडरपास येथे उघडकीस आला.
याप्रकरणी रामदास हरिभाऊ भोंडवे (वय 62, रा.मोशी) व सलिम शेख (रा. मामुर्डी) यांच्यावर प्राणी संरक्षण अधिनियम आणि प्राण्याचा छळ प्रतिबंध या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Bhosari : पेट्रोलपंपावर 18 लाख रुपयांची अफरातफर करणाऱ्या व्यवस्थापकावर गुन्हा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुनावळे (Ravet) येथे आरोपी त्यांच्या गाडीतून तीन गायी दाटीवाटीने उभी करून चारा पाणी देऊन कत्तलीसाठी मोशी येथे घेऊन जात होते. पोलिसांना याची खबर मिळताच पोलिसांनी छापा टाकून गायीची सुटका केली आहे. यावरून रावेत पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.