Chinchwad: चिंचवडमध्ये विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

एमपीसी न्यूज – चिंचवडमध्ये गणपती विसर्जन (Chinchwad) मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. पाणावलेल्या डोळ्यांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला जात आहे.

दुपारी साडेचार वाजता मिरवणुकीला सुरुवात झाली. शिवतेज मित्र मंडळ साडेचार वाजता विसर्जन घाटाकडे रवाना झाले.
मिरवणुक पाहण्यासाठी रस्त्यांच्या दुतर्फा नागरिकांनी गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे. चिंचवड, चापेकर चौकात महापालिका आणि पोलिसांच्या वतीने स्वागत कक्ष उभारण्यात आला आहे.

अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, माजी सभागृह नेते नामदेव ढाके, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी नगरसेवक माऊली थोरात, राजू दुर्गे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्या हस्ते गणेश मंडळांचे स्वागत करण्यात येत आहे.

Pune Ganpati Visarjan Live 2023 : परंपरेनुसार मानाच्या पहिल्या गणपती पाठोपाठ दुसऱ्या गणपतीचेही झाले विसर्जन

दहा दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर आज मोठ्या (Chinchwad) उत्साहात आणि जल्लोषात बाप्पाला निरोप दिला जात आहे. गणपती मोरया, मंगलमूर्ती मोरया अशा घोषणांचा जयघोष करत पुढच्या वर्षी लवकर येण्याची साद घालत बाप्पाला निरोप दिला जात आहे. चिंचवड घाटावर कृत्रिम हौद उभारण्यात आला आहे. हौदातच गणेश मूर्तीचे विसर्जन केले जात आहे.

नदी पात्रात कोणालाही विसर्जन करू दिले जात नाही. घाटावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे. मूर्तीदान उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.