Pimpri Vaccination News : 18 वर्षांपुढील नागरिकांना शनिवारी मिळणार ‘कोविशिल्ड’ची लस

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील 18 वर्षांपुढील नागरिकांना 36 केंद्रांवर ‘कोविशिल्ड’चा पहिला तर 45 वर्षांपुढील नागरिकांना 25 केंद्रांवर ‘कोविशिल्ड’चा पहिला व दुसरा डोस उद्या (शनिवारी) मिळणार आहे. तर, 18 ते 44 या वयोगटातील आणि 45 वर्षांपुढील नागरिकांना दोन केंद्रांवर ‘कोव्हॅक्सिन’चा पहिला व दुसरा डोस देण्यात येणार आहे.

18 ते 44 वयोगटातील नागरिकांना ”कोविशिल्ड’ चा पहिला डोस ‘या’ केंद्रांवर मिळणार !

कै. हभप प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पिटल आकुर्डी, संजय काळे सभागृह, साई अंब्रेला संभाजीनगर दवाखाना, घरकुल दवाखाना चिखली, महापालिका शाळा जाधववाडी, रुपीनगर शाळा, यमुनानगर रुग्णालय, स्केटिंग ग्राऊंड यमुनानगर, प्राथमिक शाळा म्हेत्रे वस्ती, नुतन शाळा ताम्हाणे वस्ती, आचार्य अत्रे सभागृह, संत तुकारामनगर, नेहरुनगर उर्दु शाळा, मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल, संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल इंद्रायणीनगर, सखुबाई गार्डन भोसरी, सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा मोशी दवाखाना, छत्रपती शाहु महाराज प्राथमिक विद्यालय दिघी, बोपखेल दवाखाना, अंकुशराव लांडगे नाट्यगृह भोसरी, आदिशक्ती हॉस्पिटल भोसरी, अहिल्याबाई होळकर शाळा सांगवी, निळु फुले नाट्यगृह सांगवी, गणेश इंग्लिश स्कुल दापोडी, खिवंसरा हॉस्पिटल थेरगाव, पिंपळेनिलख इंगोले शाळा, महापालिका शाळा वाकड, यशवंतराव चव्हाण प्राथमिक शाळा ग प्रभाग, अण्णासाहेब मगर शाळा पिंपळेसौदागर, नवीन जिजामाता रुग्णालय, नताशा आय क्लिनिक पिंपळेसौदागर, काकाज इंटरनॅशनल स्कूल तापकिर मळा, काळेवाडी, फकीरभाई पानसरे उर्दू शाळा चिंचवड स्टेशन, गुरुद्वारा वाल्हेकरवाडी, मोरेश्वर भोंडवे कार्यालयाजवळ पुनावळे, अश्विनी मेडिकल फाऊंडेशन मोरया हॉस्पिटल चिंचवड आणि प्रेमलोक पार्क दवाखाना या 36 केंद्रांवर 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लस मिळणार आहे.

कोविन ॲपवर नोंदणी करुन 100 टक्के ऑनलाईन स्लॉट बुकिंग केलेल्या लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येईल. उद्या सकाळी 8 वाजल्यानंतर स्लॉट बुकिंगसाठी ओपन करण्यात येणार आहेत.

तर, ज्या 45 वर्षांपुढील नागरिकांनी, एचसीडब्ल्यू आणि फ्रंट लाईन वर्कर यांनी पूर्वी ‘कोविशिल्ड’ या लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यांना ‘कोविशिल्ड’ या लसीचा दुसरा डोस हा 12 ते 16 आठवडयांच्या दरम्यान (84ते 112 दिवस) देण्यात येणार आहे. उद्या 25 केंद्रांवर कोविशिल्डचा पहिला, दुसरा डोस देण्यात येणार आहे.

‘कोविशिल्ड’चा पहिला, दुसरा डोस ‘या’ केंद्रांवर मिळणार!

हेडगेवार जलतरण तलाव, ईसआयएस हॉस्पिटल मोहननगर, आरटीटीसी सेंटर, महापालिका कन्या शाळा चिखली, भानसे स्कूल यमुनानगर, दिनदयाल शाळा पिंपरी, क्वालिटी सर्कल भोसरी, नवीन भोसरी रुग्णालय, पंडित जवाहरलाल नेहरु शाळा च-होली, सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा भोसरी, गंगोत्री पार्क दिघी, शकुंतला शितोळे शाळा जुनी सांगवी, बालाजी लॉन्स जुनी सांगवी, आबाजी रामभाऊ भूमकर प्राथमिक शाळा भूमकर वस्ती, मारुती गेनू कस्पटे प्राथमिक शाळा, कांतीलाल खिंवसरा पाटील प्राथमिक शाळा मंगलनगर, थेरगाव, महापालिका शाळा पवनानगर काळेवाडी, महापालिका शाळा रहाटणी, कर्मवीर भाऊराव पाटील वाघेरे ड प्रभाग, जुने तालेरा रुग्णालय, महापालिका शाळा किवळे, बिलजीनगर दवाखाना, कामत हॉस्पिटल पिंपरी नर्सिंग स्कुल चिंचवड, बापूराव ढवळे प्राथमिक शाळा पुनावळे आणि महापालिका शाळा वाल्हेकरवाडी या केंद्रावर कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उद्या सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत दिला जाणार आहे. ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅप या पद्धतीने हे लसीकरण करण्यात येणार आहे. तर, परदेशात उच्च शिक्षणासाठी जाणा-यांना नवीन जिजामाता रुग्णालयात लस देण्यात येणार आहे.

‘कोव्हॅक्सिन’चा पहिला, दुसरा डोस ‘या’ केंद्रांवर मिळणार !

18 ते 44 या वयोगटातील लाभार्थ्यांना पिंपळेगुरव माध्यमिक शाळेत 100 च्या क्षमतेने ‘कोव्हॅक्सिन’चा पहिला, दुसरा तर 45 वर्षांपुढील नागरिकांना स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल, फुलेनगर येथे ‘कोव्हॅक्सिन’चा पहिला, दुसरा डोस देण्यात येणार आहे.

गर्भवती महिलांना ‘या’ केंद्रांवर मिळणार लस

सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा भोसरी, कै. हभप प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पिटल आकुर्डी, यमुनानगर रुग्णालय, आचार्य अत्रे सभागृह, पिंपरी, अहिल्याबाई होळकर शाळा सांगवी, खिंवसरा पाटील हॉस्पिटल थेरगाव, नवीन जिजामाता रुग्णालय आणि जुने तालेरा रुग्णालय येथे गरोदर महिलांचे लसीकरण करण्यात येणार आहे. 50 डोस राखीव ठेवण्यात आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.