Pimpri : मतदार यादी शुध्दीकरणाचे काम युध्दपातळीवर!

व्होटर ऍपच्या माध्यमातून नव मतदारांनी नोंदणी करावी

एमपीसी न्यूज –   चिंचवड, भोसरी आणि पिंपरी या तिन्ही विधानसभा मतदार संघात आज (शनिवार) आणि उद्या (रविवार) नव मतदार नोंदणी (Pimpri ) जास्तीत-जास्त व्हावी, यासाठी पत्रक वाटण्यात येणार आहे. तसेच या पत्रकावर अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी स्कॅनर देण्यात आले आहेत. नवमतदारांनी कोड स्कॅन करून माहिती भरून आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करावे, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी नीलेश देशमुख यांनी केले आहे. तसेच चिंचवड विधानसभा मतदार संघात मतदार यादी शुध्दीकरणाचे काम युध्दपातळीवर सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

Today’s Horoscope 19 August 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

शहरातील तिन्ही विधानसभा मतदार संघात नवमतदार नोंदणी, स्थालांतर मतदारासह मतदार यादी शुध्दीकरणाचे काम सुरू आहे. यासाठी चिंचवड मतदार नोंदणी कार्यालयामार्फत सोसायट्यांमध्ये कॅम्प, महाविद्यालयात स्पर्धा घेण्यात येणार आहे. याबाबत माहिती देताना मतदार नोंदणी अधिकारी नीलेश देशमुख म्हणाले, चिंचवड विधानसभा मतदार संघ हा राज्यातील दुसऱ्या (Pimpri ) क्रमांकाचा मतदार संख्या असलेला मोठा मतदार संघ आहे. आणखी काही मतदारांची नावे मतदार यादीत नाही, त्यांच्या नावाचा समावेश व्हावा, यासाठी निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार वेळोवेळी जनजगृतीसह विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

नवमतदारांना मतदार यादीत नाव नोंदणी करण्यासाठी त्यांच्या जनजागृती होण्यासाठी तिन्ही मतदार संघात पत्रके वाटण्यात येणार आहेत. तसेच या पत्रकावर अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी स्कॅनर देण्यात आले आहेत. नवमतदारांना कार्यालयात जाण्याची गरज नाही. कोड स्कॅन करून माहिती भरून आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करावे. चिंचवड मतदार संघात घरोघरी बीएलओ भेट देत असून मतदार यादी शुध्दीकरण करण्यात येत आहे.

हे अर्ज भरा!
नवमतदारांना नाव नोंदणी करण्यासाठी मतदारांसाठी-अर्ज क्र. 6, परदेशी मतदारांची नोंदणीसाठी- अर्ज क्रं.6 अ, निवडणूक प्रमाणीकर फॉर्म-6 ब, इतर व्यक्तीचे नाव समाविष्ट करण्याबाबत आक्षेप घेण्यासाठी, स्वतःचे नाव वगळण्यासाठी, इतर कोणत्याही व्यक्तीचे नाव मृत्यू किंवा स्थलांतर झाल्यामुळे वगळण्यासाठी – अर्ज क्र. 7, मतदार यादीतील तपशिलामध्ये करावयाच्या दुरुस्त्यांसाठी – अर्ज क्र. 8 भरून द्यावा, असे आवाहनही मतदार नोंदणी अधिकारी देशमुख (Pimpri ) यांनी केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.