Pimpri : मोबाईल दिला नाही म्हणून तरुणावर कुऱ्हाड व कोयत्याने वार

एमपीसी न्यूज – दोन अल्पवयीन मुलांनी त्यांच्याच मित्रावर केवळ (Pimpri ) मोबाईल दिला नाही म्हणून कुऱ्हाडीने व कोयत्याने वार करत गंभीर जखमी केले आहे. हा धक्कादायक प्रकार भोसरी पीएमटी चौक येथे रविवारी (दि.16) मध्यरात्री घडला.

याप्रकरणी जखमी मुलाच्या आईने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांवर बेकायदा शस्त्र बाळगणे व जिवे ठार मारण्याचा प्रयत्न याचा गुन्हा दाखल केला आहे.

Pune :अनैतिक संबंधातून जन्मलेले बाळ रुग्णालयाच्या खिडकीतून फेकले; 19 वर्षीय तरुणीवर गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा कुणाल सचिन ढाके (वय 19) व आरोपी मुले हे मित्र होते. कुणाल कडे त्याचा मोबाईल होता. आरोपी मुलांनी  तो त्याला मागितला.

यावेळी कुणालने नकार दिला असता चिडून अल्पवयीन मुलांनी त्यांच्याकडे असलेल्या कुऱ्हाडीने कुणालच्या डोक्यात , कानावर कुऱ्हाड व लोखंडी कोयत्याने वार केले. यात कुणाल हा गंभीर जखमी झाला आहे, भोसरी पोलीस याचा पुढील तपास (Pimpri ) करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.