Punawale : पुनावळे मध्ये चितळे मिठाई सह तीन दुकाने चोरट्यांनी फोडली

एमपीसी न्यूज – पुनावळे य़ेथील ईला सोसायटी बाहेरील (Punawale) चितळे मिठाईवाले यांचे मिठाईचे दुकान व त्याला लागून असलेल्या न्यू पुना बेकरी व हार्डवेअरचे शॉप चोरट्यांनी फोडले असून दुकानातून रोख रक्कम चोरून नेली आहे. हा प्रकार शनिवारी (दि.15) रात्री ते रविवारी (दि.16) सकाळी सात या कालावधीत घडली आहे.

याप्रकऱणी वैभव विद्याधर अफजलपुरकर (वय 33 रा.चिंचवड) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Pimpri : मोबाईल दिला नाही म्हणून तरुणावर कुऱ्हाड व कोयत्याने वार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे चितळे मिठाईवाले तसेच न्यू पुना बेकरी नावाच्या दुकानाचे लोखंडी शटर तसेच जवळ असलेल्या आदित्य विवेक काकडे (रा. पुणे) यांचे श्रीपाद हार्डवेअर नावाच्या दुकानाचे शटर चोरांनी उचकटले आहे.

दुकानात प्रवेश करत चोराने ड्रॉव्हरमधून श्रीपाद हार्डवेअर मधून 25 हजार 780 रुपये रोख तसेच 5 हजार रुपयांचे चांदीचे नाणी चोरले , तसेच चितळे मिठाई शॉपमधून 8 हजार रुपये रोख व पुना बेकरी येथून 30 हजार रुपये असा  एकूण 68 हजार 780 रुपये चोरून नेले आहेत. यावरून रावेत पोलीस ठाण्यात (Punawale) गुन्हा दाखल केला असून पोलीस चोराचा शोध घेत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.