PMPML : पीएमपीएमएलकडून दोन बस मार्गांचा विस्तार, तर एका बस मार्गामध्ये बदल

एमपीसी न्यूज : पीएमपीएमएलतर्फे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात (PMPML) दोन बस मार्गाचा विस्तार केला असून तर एका बसमार्गात बदल करण्यात आला आहे. हा बदल व विस्तार 1 जुलैपासून अंमलात आणला जाणार आहे.

पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून प्रवाशांच्या मागणीनुसार बसमार्ग क्र. 35 अ व 167 या दोन बसमार्गांचा विस्तार करण्यात येत आहे. बसमार्ग क्र. 35 अ शिवाजीनगर/सिमला ऑफिस ते डांगे चौक या मार्गाचा विस्तार इंदिरा कॉलेज (ताथवडे) पर्यंत करण्यात येत आहे व बसमार्ग क्र. 167 वाघोली ते हडपसर या मार्गाचा विस्तार भेकराईनगर डेपो पर्यंत करण्यात येत आहे. याचबरोबर बसमार्ग क्र. 277 – भोसरी ते कोथरूड डेपो या मार्गात बदल करून (PMPML) पिंपळेगुरव, साईचौक व सांगवी मार्गे करण्यात येत आहे.

  • मार्ग क्रमांक 35 अ – शिवाजीनगर/सिमला ऑफिस ते इंदिरा कॉलेज (ताथवडे).
  •  मार्गे – औंधगाव, डांगे चौक, ताथवडे गाव,जे.एस.पी.एम कॉलेज,डी.वाय.पाटील कॉलेज.
  •  बस संख्या – 3
  •  वारंवारिता – 50 मिनिटे.
  •  मार्ग क्रमांक 167 – भेकराईनगर डेपो ते वाघोली.
  •  मार्गे – मगरपट्टा, मुंढवा व खराडी बायपास.
  •  बस संख्या – 16
  •  वारंवारता – 10 मिनिटे.
  •  मार्ग क्रमांक 277 – भोसरी ते कोथरूड डेपो.
  •  मार्गे – पिंपळे गुरव, साई चौक व सांगवी.
  •  बस संख्या – 4
  •  वारंवारिता – 60 मिनिटे.

या बस सेवेचा लाभ प्रवाशी नागरिक, विद्यार्थी, नोकरदार, महिला वर्ग व ज्येष्ठ नागरीक यांनी घ्यावा असे आवाहन परिवहन महामंडळाकडून करण्यात येत आहे.

Pune : हॉकी स्पर्धेत कीडस इलेव्हन, मध्य रेल्वेची आगेकूच

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.