Polytechnic Admission : पॉलिटेक्निक प्रवेशाच्या तारखा जाहीर, ‘या’ कालावधीत करता येणार अर्ज

मंत्री उदय सामंत यांनी ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली आहे. : Polytechnic admission dates announced, applications can be made during this period

एमपीसी न्यूज – इयत्ता दहावीनंतर अभियांत्रिकी क्षेत्रात करियर करण्यासाठी विद्यार्थी पॉलिटेक्नीकला प्रवेश घेत असतात. शासकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळावा यासाठी स्पर्धा असते. इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली असताना पॉलिटेक्नीकच्या प्रवेश प्रक्रियेची तारीख देखील उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केली आहे.

मंत्री उदय सामंत यांनी ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली आहे.

शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी तंत्र शिक्षणातील प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया 10 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट या कालावधीत राबविण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी राज्यामध्ये अभियांत्रिकी पदविका प्रवेशासाठी 336 सुविधा केंद्रांची आणि बारावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमांसाठी 242 सुविधा केंद्रांची निवड केली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेसाठी, गर्दी टाळण्याच्या दृष्टीने कागदपत्रांच्या प्रत्यक्ष छाननी करणे या पद्धती सोबतच ई-स्कूटनीची संकल्पना राबविण्यात येणार आहे.

याद्वारे अर्जदारास प्रत्यक्ष सुविधा केंद्रास भेट देण्याची आवश्यकता नाही. अर्ज भरण्यापासून संस्थेत प्रवेश निश्चिती करण्यापर्यंतची सर्व प्रक्रिया ते स्वतः ऑनलाईन पद्धतीने करू शकतील, असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे.

मात्र, याबाबत तंत्रशिक्षण विभागाच्या परिपत्रकाची प्रतिक्षा आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.