Kargil Vijay Divas : प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल अँड ज्यूनियर कॉलेज मध्ये कारगिल विजय दिवस साजरा

एमपीसी न्यूज : काळभोरनगर येथील प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल अँड ज्यूनियर कॉलेजच्या वतीने आज (बुधवारी) 23 वा कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. (Kargil Vijay Divas) विद्यालयात प्रमुख अतिथी म्हणून कारगिल युद्धात महत्वाची भूमिका बजावणारे निवृत्त कर्नल मोदीन नडाफ यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी कारगिल युद्धात मरण पावलेल्या शहीद जवानांना मानवंदना दिली व कारगिल युद्धात आलेले अनुभव व मिळवलेल्या विजयाबद्द्लची माहिती विद्यार्थ्यांना दिली.

 

Srirang Kalaniketan : श्रीरंग कलानिकेतनचा 37 वा वर्धापन दिन नेत्रदीपक भरतनाट्यम शैलीतील शास्त्रीय नृत्यरचनांनी संपन्न

 

यावेळी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीते सादर केली. विद्यालयाचे स्काउट गाईडचे शिक्षक मारिअप्पन मुदलीयार यांच्या नेत्रृत्वाखाली 9 वीच्या विद्यार्थ्यांनी परेड सादर केली. (Kargil Vijay Divas) कर्नल मोदीन नडाफ़ यांनी विद्यालयातील राइफ़ल शुटींग सभागृहाचे अनावरण केले व विद्यालयाने आयोजित केलेल्या आंतरशालेय राइफल शुटींग स्पर्धेचे विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी विद्यालयाच्या प्राचार्या सविता ट्रॅव्हिस यांनी वीर जवानांच्या जीवनातून धडे घेण्याविषयी सांगितले. विद्यालयाच्या शिक्षिका जसलीन कौर यांनी सूत्रसंचालन केले तर अनुराधा निलंगी यांनी आभार मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.