Pu La Deshpande : पु. ल. देशपांडे जन्मदिनानिमित्त त्यांच्या साहित्यकृतींचे स्मरण

एमपीसी न्यूज – प्रसिद्ध  साहित्यिक  पु. ल. देशपांडे  यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या पुण्यातील भांडारकर रस्ता येथील निवासस्थानी असलेल्या नामफलकाला (Pu La Deshpande) पुष्पहार अर्पण करून अभिवादन  करण्यात आले. याप्रसंगी बटाट्याची चाळ, मैत्र, अपूर्वाई,दाद, पूर्वरंग आदी साहित्यकृतीची पुस्तके हातात धरून महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व असलेल्या पु.ल. देशपांडे यांना उपस्थितांनी अभिवादन केले.

यावेळी यशस्वी एकेडमी फॉर स्किल्स संस्थेचे संचालक अजय रांजणे, रसिक साहित्य प्रकाशन संस्थचे व्यवस्थापक भरत  दारवटकर, राहुल कोल्हापुरे, सुरेश दांडेकर, ऋतुराज  वायचळ, ओंकार घुगरदरे ज्ञानेश्वर गोफण, शाम वायचळ व अशोक दोडके उपस्थित होते.

NCP : मुख्यमंत्री शिंदे यांनी कृषी मंत्री सत्तार यांचा राजीनामा घ्यावा :- ॲड. तापकीर

दरवर्षी पु. ल. देशपांडे यांच्या जन्मदिनी त्यांनी लिहिलेले एक पुस्तक विकत घेऊन वाचण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.(PU LA Deshpande) तर रसिक साहित्य संस्थेतर्फे राबविण्यात येणाऱ्या घरपोच सेवा देणाऱ्या रसिक पुस्तक वाचन योजनेची माहिती  भरत दारवटकर यांनी दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.