PCMC: सहायक आयुक्त निलेश देशमुख यांच्याकडे ‘एलबीटी’चे कामकाज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (PCMC) उपआयुक्त स्मिता झगडे यांच्या रजा कालावधीत त्यांच्याकडील स्थानिक संस्था कर विभागाचे अतिरिक्त कामकाज करसंकलन विभागाचे सहायक आयुक्त निलेश देशमुख यांच्यावर सोपविण्यात आले आहे. याबाबत आयुक्त शेखर सिंह यांच्या मान्यतेने सामान्य प्रशासन विभागामार्फत उपआयुक्त विठ्ठल जोशी यांनी स्वतंत्र आदेश काढला आहे.  

महापालिकेच्या आस्थापनेवर उपआयुक्त पदावर कार्यरत असणाऱ्या स्मिता झगडे यांनी  1 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर 2022  या कालावधीत रजेवर असल्याबाबत कळविले आहे.  प्रशासकीय कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने या कालावधीत त्यांच्याकडील स्थानिक संस्था कर विभागाचे कामकाज अन्य अधिकाऱ्यांकडे सोपविणे आवश्यक होते.

या कालावधीत सहायक आयुक्त निलेश देशमुख यांच्यावर (PCMC) करसंकलन विभागाच्या कामकाजासह स्थानिक संस्था कर विभागाचे अतिरिक्त कामकाज सोपविण्यात आले आहे, असे आदेशात नमूद केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.