Punawale : प्रस्तावित कचरा डेपोची जागा पोलीस आयुक्तालयाला द्या; पुनावळेकर नागरिकांची मागणी

एमपीसी न्यूज – पुनावळे येथे होऊ घातलेल्या कचरा डेपोला (Punawale )स्थानिक नागरिकांकडून विरोध होत आहे. तसेच प्रस्तावित कचरा डेपो रद्द करून ती जागा पोलीस आयुक्तालयासाठी द्यावी, अशीही मागणी नागरिकांकडून केली जात आहे. कचरा डेपोला विरोध करण्यासाठी रविवारी (दि. 5) पुनावळे, मारुंजी, हिंजवडी, ताथवडे परिसरातून बाईक रॅली काढण्यात आली. त्यानंतर काटेवस्ती येथील जंगलात झालेल्या चिपको आंदोलनात नागरिकांनी अशी मागणी केली.

ग्रामपंचायतकडे असलेली गायरान जमीन ग्रामस्थांनी (Punawale)वन विभागाला दिली. गायरान जमिनीवर असलेले जंगल नष्ट होऊ नये, तसेच त्याचे संवर्धन व्हावे आणि इथल्या नागरिकांना नैसर्गिक साधनसंपत्ती लाभावी यासाठी ग्रामस्थांनी हा निर्णय घेतला होता. त्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेत पुनावळे गावाचा समावेश झाला. त्यामुळे या परिसरातील जी जमीन वन विभागाकडे गेली होती, ती पालिकेने परत घेतली. सन 2008 साली त्या जागेवर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे आरक्षण टाकले.

Punawale : पुनावळेत कचरा डेपो होऊ देणार नाही – आमदार अश्विनी जगताप

तेंव्हापासून नागरिकांकडून या प्रकल्पाला विरोध केला (Punawale)जात आहे. माजी आमदार स्व. लक्ष्मण जगताप यांनी त्यावेळी पालिकेच्या अधिकाऱ्यांना पुनावळे येथे कचरा डेपो करण्याबाबत हालचाली करू नये, अशा सूचना दिल्या होत्या. त्यानंतर पालिकेने देखील याबाबत कोणत्याही हालचाली केल्या नाहीत. मात्र मागील काही दिवसांपासून पालिकेकडून कचरा डेपो सुरु करण्याबाबत हालचाली सुरु झाल्या आहेत. तसा नागरिकांनी देखील पुन्हा विरोध करण्यास सुरुवात केली आहे.

15 वर्षांपूर्वी पुनावळे परिसरात मोठ्या प्रमाणात(Punawale) लोकवस्ती नव्हती. मात्र आयटी पार्क आणि उद्योगांमुळे इथे मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढली आहे. नागरिकांनी परिसरात घरे घेताना आरक्षण पाहून घ्यायला हवे होते, असा प्रशासन दावा करत असल्याचे म्हटले जाते. मात्र बांधकाम व्यावसायिकांनी इथे जंगल आहे, असे सांगून घरे विकली असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

प्रस्तावित कचरा डेपोला विरोध सुरु असतानाच ही जागा पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाला द्यावी, अशीही मागणी जोर धरत आहे. पोलीस आयुक्तालय झाल्यास इथे पोलिसांचा वावर वाढेल. हे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अधिक फायदेशीर ठरेल.

जंगलाची 26 हेक्टर जागा पोलिसांना मिळाली तर तिथे पोलीस मुख्यालय, परेड ग्राउंड, पोलीस भरती मैदान, हॉलिबॉल मैदान, हॉकी अथवा इतर एक मैदान, पोलीस निवास, पोलीस दवाखाना, पोलीस पाल्यांसाठी शाळा, शस्त्रागार, बीडीडीएस, श्वान पथक, आरसीपी, बहुद्देशीय हॉल यातील बहुतांश गोष्टी इथे उभारता येतील.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.