Pimpri News : 1971 भारत-पाक युद्ध विजय दिनाला 50 वर्ष पूर्ण झाल्याने ‘महाराष्ट्र फेस्टिव्हल’चे आयोजन

एमपीसी न्यूज :  पिंपरी- चिंचवड डिफेन्स फोर्स लीगने 10 आणि 11 डिसेंबर (Pune) रोजी ए.एस.एम. कॉलेजमध्ये ‘1971 भारत-पाक युद्ध विजय दिवस’ आणि ‘PARA SF पुंगाली दिनाला 50 वर्ष पूर्ण झाल्यामुळे ‘महाराष्ट्र फेस्टिव्हल’ साजरा केला. यामध्ये 10 डिसेंबर रोजी महाराष्ट्र फेस्टिव्हल राज्यस्तरीय नृत्य व गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तर, 11 डिसेंबर रोजी डिव्हाईन मिस, मिस टीन, मिसेस महाराष्ट्र 2022 फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते.

या महोत्सवात 22 शाळांतील 11000 विद्यार्थी, त्यांचे शिक्षक आणि पालकांसह सहभागी झाले होते. मिस, मिसेस आणि मिस टीन महाराष्ट्र विजेत्यांना प्रमुख पाहुणे भारताचे पहिले पॅरा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांच्या हस्ते विजयी मुकुट प्रदान करण्यात आले. प्रमुख पाहुणे काँग्रेस शहराध्यक्ष कैलाश कदम, इंडियन एक्स सर्व्हिसेस लीग महाराष्ट्र अध्यक्ष सुभेदार मेजर, यशवंत महाडिक, भारतीय नौदलाचे डी एच कुलकर्णी, इंडियन एक्स सर्व्हिसेस लीग पुणे, संदीप जाधव, संतोष खंडागळे यांच्या हस्ते धावणे, रायफल शूटिंग, कबड्डी, हस्तकला, नृत्य आणि गायन या खेळातील विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

सामान्य कुटुंबातील मुलींना, महिला, शालेय विद्यार्थिनी, कारखान्याचे कामगार, PCMC कामगार, शिक्षक, महाविद्यालयीन विद्यार्थिनी आणि गृहिणी यांना डिफेन्स फोर्स लीगचे संस्थापक नरेश गोल्ला यांनी मिस महाराष्ट्र प्लॅटफॉर्म पूर्णपणे मोफत दिले होते. डिफेन्स फोर्स लीगचे अध्यक्ष माजी पॅरा कमांडो रघुनाथ सावंत यांनी सर्वांचे स्वागत केले.

स्पर्धकांचे जजिंग अल्ट्रा रनर – अमय पाटणकर, व्ही एफ एक्स सुपरवायझर मंगेश पालकृत, फॅशन ग्रुमर मुजीब खान, मिस दिव्या बिराजदार, जावेद कुरेशी, डान्सर साक्षी आवटी, संगीत विशारद नंदिन सरीन (पीसीएमसी संगीत अकादमी) यांनी केले. 1971 च्या भारत पाक युद्धातील शहीदांना श्रद्धांजली वाहण्यात (Pune) आली.

यावेळी इस्रोचे शास्त्रज्ञ डॉ. सिन्हा, डॉ. किशोरी आपटे (व्हायरोलॉजी इन्स्टिट्यूट), प्रवीण तुपे (सीईओ पीसीएमसी सायन्स पार्क), लिटल साईनटिस्ट ग्रुपचे दत्ता गिरमकर, रूपीनगर शिक्षण प्रसारक मंडळ, ज्ञानदीप विद्यालयाचे विश्वस्त व मुख्याध्यापक, राऊत आणि राजे शिवछत्रपती विद्यालय तळवडेचे शिंदे, राजश्री शाहू विद्यालयाचे बाबाजी शिंदे, नवमहाराष्ट्र विद्यालय रुपीनगरचे आशिष गौंड यांची विशेष उपस्थिती होती.

Chinchwad News : माझ्या यशात निर्माते, दिग्दर्शक, सहकलाकारांचा मोठा वाटा – प्रशांत दामले

कार्यक्रमाचे आयोजन डिफेन्स फोर्स लीग आणि डीएफएल प्रेजेंटचे संस्थापक नरेश गोल्ला, डिफेन्स फोर्स लीगचे अध्यक्ष माजी पॅरा कमांडो रघुनाथ सावंत, डीएफएल संचालक राजेंद्र जाधव, डीएफएल प्रेजेंटचेच्या संचालिका दृष्टी सुतारिया, सिद्धराम बिराजदार, अजय खोमणे, निलेश विसपुते, चेतना कंठाळे, सुनील वडमारे, हृषीकेश जाधव, संदिप कांबळे यांनी केले होते.

तसेच, 350 माजी आर्मी PARA कमांडो कुटुंब ‘2 पॅरा एसएफ माझी सैनिक संघ’, अखिल भारतीय गट सातारा, संस्थापक कर्नल एल.जे.एस. गिल सह प्रमुख पाहुणे कर्नल के.आर.राव, सेवारत सुभेदार मेजर राम निवास – 2 PARA SF, सुभेदार मेजर मानद कॅप्टन संजय पुर्जे – TRG 2 PARA SF, अध्यक्ष सुभेदार के. काटेकर, हवालदार अरुण पवार, सुभेदार कणसे, सुभेदार रोकडे, हवालदार दाते 50 व्या पूंगली दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. 1971 च्या युद्धादरम्यान पॅरा एसएफच्या पुंगली ब्रिज ऑपरेशन्सवर आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर नाट्य सादर करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.