Chinchwad News : इतिहासाचे जागरण करायला हवे – गिरीश प्रभुणे

एमपीसी न्यूज  – मूळ इतिहास हळूहळू विकृत करण्यात समाजकंटक भर घालत आहेत. त्यासाठी इतिहासाचे जागरण केले पाहिजे. (Chinchwad News) समाजातील भेदाभेद दूर व्हायला हवेत, असे प्रतिपादन प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि गिरीश प्रभुणे यांनी मंगळवारी (दि.13) चिंचवड येथे केले.

चिंचवड देवस्थान ट्रस्ट, महापालिका व ग्रामस्थांच्या वतीने  श्रीमन महासाधू श्री मोरया गोसावी महाराज यांच्या 461 व्या संजीवन समाधी महोत्सवानिमित्त चिंचवड येथे  आयोजित कार्यक्रमात मंगळवारी (दि.13 ) प्रसिद्ध इतिहासतज्ज्ञ  पांडुरंग बलकवडे यांचा प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि पद्मश्री गिरीशजी प्रभुणे यांच्या हस्ते ‘ श्री मोरया जीवनगौरव पुरस्कार ‘  देऊन सन्मान करण्यात आला.  शाल, मानपत्र, स्मुतीचिन्ह, भेटवस्तू असे  पुरस्काराचे स्वरूप होते. देऊळमळा पटांगणावर हा कार्यक्रम झाला. त्यावेळी प्रभुणे बोलत होते.

प्रभुणे म्हणाले, ” आजकाल काही इतिहास संशोधक अफजलखान, औरंगजेब यांना मोठे करण्याचे काम करीत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांची भेट झाल्याची कागदपत्रे आहेत. पांडुरंग  बलकवडे हे कधीच कागदपत्रांशिवाय बोलले नाहीत. (Chinchwad News) तक्षशिला, नालंदा येथील विद्यापीठांमध्ये परदेशामधून लोक शिकायला येत होते. मग तेथे स्वकीयांना कसा प्रवेश नसेल? बहुजन समाजातील अनेक वीरांनी देश घडविला. त्यावेळी देशाच्या कानाकोपऱ्यात ज्ञानसंपन्न समाज राहत होता. पूर्वी भारत शास्त्र निर्यात करीत होता. वडार, ओतारी, लोहार समाजाने मंदिरे बांधली. मोरया गोसावी यांच्यापुढे मुस्लिम सम्राट नतमस्तक झाले.’

Pimpri News : 1971 भारत-पाक युद्ध विजय दिनाला 50 वर्ष पूर्ण झाल्याने ‘महाराष्ट्र फेस्टिव्हल’चे आयोजन

सत्काराला उत्तर देताना बलकवडे म्हणाले, ”माझ्याकडून साधू संतांची सेवा व्हावी. इतिहासाचे अज्ञात पैलू जगासमोर येण्याची गरज आहे. हिंदू संस्कृतीमध्ये साधू संत यांचे महत्व मोठे आहे. विश्वाला दिशा देण्याचे कार्य ऋषी-मुनींनी केले. ज्यावेळी देश परकीयांच्या गुलामीत होता त्यावेळी देशाच्या संस्कृतीचे रक्षण करू शकणारे राजे अस्तित्वात नव्हते. अशा कठीण काळात साधू संत यांनी संस्कृतीच्या रक्षणाचे कार्य केले.”

ट्रस्टच्या वतीने आगामी काळात अल्प दरात अन्नछत्र सुरु करण्याचा मनोदय मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव आणि हभप आनंद तांबे यांनी व्यक्त केला. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्यांचाही पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये महाबळेश्वरकर गुरुजी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा विशेष पुरस्कार वेदचुडामणी दत्तभार्गव पेंडसे गुरुजी यांना मंदार महाराज देव यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.

या व्यतिरिक्त धनंजय गावडे – गोसेवा, सुनील सिद्धगवळी – कबड्डीपटू, वैभव ठोंबरे – सायकलपटू, श्रीकांत चौगुले – शिक्षक व लेखक, आयुष्य आणि अथर्व राकेश सायकर (स्केटिंग), डॉ. रंजना पाटील – शैक्षणिक क्षेत्र , डॉ. प्रेरणा बेरी कालेकर – ऊर्जा आयुर्वेदाच्या माध्यमातून सामाजिक कार्य, हर्षल पंडित – व्यसनमुक्ती, दत्तात्रेय गोते – तरुणांना उद्योजकतेसाठी प्रोत्साहन, अंबादास कवळे – ग्रंथालय प्रसार, विलास वाघचौरे – सर्पमित्र, नानासाहेब पवार – शैक्षणिक, नरहरी म्हात्रे – नारंगी येथील गणेश आणि हनुमान मंदिरातील सेवेकरी, प्रभाकर भोईर – श्री मंगलमूर्ती यांच्या छत्रीचे मानकरी आदींना श्री मोरया पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. शाल, भेटवस्तू असे या पुरस्काराचे स्वरूप होते. देवस्थानच्या प्रथा, परंपरांचा प्रचार आणि प्रसार केल्याबद्दल श्रीकांत देव यांना  देव मंडळातर्फे देण्यात येणारा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

सुधीर बर्वे यांनाही विशेष पुरस्कार देण्यात आला. ऍड. नरेंद्र देव आणि अक्षय रेड्डी यांना भाद्रपद यात्रेत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पुरस्कार देण्यात आला. (Chinchwad News) चांदीचे नाणे, भेटवस्तू, शाल असे या पुरस्काराचे स्वरूप होते. स्व. भालचंद्र देव यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा पुरस्कार वेदपाठशाळेतील विद्यार्थी प्रल्हाद जोशी आणि अवधूत देशपांडे यांना प्रदान करण्यात आला. श्री मंगलमूर्ती यांचे सहायक पुजारी सागर जोशी यांचाही पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव, विश्वस्त जितेंद्र देव, विनोद पवार, हभप आनंद तांबे, माजी मुख्य विश्वस्त विघ्नहरी महाराज देव,  अश्विनी चिंचवडे, सुरेश भोईर, मोरेश्वर शेडगे, विठ्ठल भोईर आदी उपस्थित होते.

ऍड राजेंद्र उमप यांनी प्रास्ताविक आणि उपस्थितांचे स्वागत केले. मिलिंद बावा यांनी मानपत्राचे वाचन केले आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. नरहरी म्हात्रे, नानासाहेब पवार आणि श्रीकांत चौगुले यांनी पुरस्कार्थींच्या वतीने मनोगत व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.