Chandrakant Patil : शाईफेक प्रकरणी तीनही आरोपींना जामीन मंजूर

एमपीसी न्यूज : पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या शाईफेक प्रकरणातील तीनही आरोपींना पिंपरी न्यायाल्याने जामीन मंजूर केला आहे. अशी माहिती बहुजन महापुरुष सम्मान समितीचे मारुती भापकर यांनी दिली आहे.

बहुजन महापुरुष सम्मान समितीचे मानव कांबळे म्हणाले, की या प्रकरणातील आरोपी मनोज गरबडे, विकास ओहोळ आणि आकाश इजगीसे यांना जामीन मंजूर झाला आहे. त्यांना प्रत्येकी 15,000 रुपये जात मुचलक्यावर जामीन मंजूर झाला आहे.

Chinchwad News : इतिहासाचे जागरण करायला हवे – गिरीश प्रभुणे

महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील (Chandrakant Patil) यांनी भीक मागून शाळा चालवल्या असे विधान करणा-या भारतीय जनता पार्टीचे नेते, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्याच दरम्यान शनिवारी 10 डिसेंबर रोजी चिंचवडगावात कार्यक्रमासाठी आलेल्या पालकमंत्री पाटील यांच्या तोंडावर शाई फेकण्यात आली होती.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.