Pune : भूखंडाचे श्रीखंड लाटण्यासाठी सत्ताधारी विरोधक साथसाथ

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या ताब्यात असलेली जागा मूळ मालकाला परत देण्यासाठी पुणे महापालिकेत सत्ताधारी भाजप सोबत विरोधक काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी त्यांचा हात भाजपला साथ देत कोणतीही चर्चा न करता दिला. महापालिकेचा अडीच एकराचा भूखंड मूळ मालकाला परत देण्यासंदर्भातील प्रस्ताव राज्यशासनाला पाठवण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. 

महापालिकेच्या अनेक विषयांवर एकमेकांना धारेवर धरणारे विरोधक मात्र जागा देण्याच्या प्रस्तावर गप्प बसले होते. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत काल पीएमपीला जागा देण्याचा प्रस्ताव सुद्धा होता. मात्र, पीएमपीला जागा वाणिज्य वापरासाठी देऊच नये यावर मोठ- मोठी भाषणे करणारे काँग्रेस राष्ट्रवादीचे नगरसेवकांनी याविषयावर मात्र मौन बाळगले. ही जागा पुन्हा मूळ मालकाला गेल्यास पालिकेचे सुमारे 200 ते 300 कोटीचे नुकसान होणार यामध्ये मोठे आर्थिक हितसंबंध जोपासले गेले असल्याची चर्चा पालिकेत आहे. जागा परत देण्यासाठी वरिष्ठ नेत्यांकडून आदेश आले असल्याची चर्चा नगरसेवकांमध्ये होती. 

सिंहगड रस्त्यावर सर्वे क्रमांक 120 अ आणि 120 ब अशी अडीच एकर जागा आहे. महापालिकेने उच्च न्यायालयाने सात दिवसांपूर्वीच जागा मालकाची याचिका फेटाळली. तर अन्य एक दावा न्यायालयात प्रलंबित असताना सत्ताधारी भाजपने निर्णय घेतला असल्यामुळे अच्छे दिनाचा दावा करणाऱ्यांनी पालिकेचे नुकसान केले असल्याची पालिकेत चर्चा होती. अडीच एकर जागा देण्याचा प्रस्ताव आधी स्थायी समितीमध्ये भाजपच्या नगरसेविका मंजुषा नागपुरे, राष्ट्रवादीचे नगरसेवक दिलीप बराटे आणि प्रिया गदादे यांनी मांडला होता. कोणतीही चर्चा न करता हा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये मान्य करण्यात आला. काही नगरसेवकांनी यावर फेरविचार सुद्धा दिला. मात्र, त्यांची तलवार सुद्धा सर्वधारण सभेत मान्य झाली. कोणत्याच गटनेत्यांनी यावर आक्षेप घेतला नाही. काल सभागृहामध्ये नगरसचिवांनी विषय पुकारला यावेळी सर्व सभागृहामध्ये अतिशय शांतता निर्माण झाली. 

नगरसेवकांच्या विषयावर अभिप्राय मागणारे लोकप्रतिनिधी सुद्धा यावेळी शांत होते. महापालिकेतील विरोधी पक्षनेते यांनी सुद्धा केवळ बघ्याची भूमिका घेतली. सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांना तर हा प्रस्ताव कधी मान्य होईल असे झाले होते. प्रस्ताव पुकारल्यानंतर राष्ट्रवादीचे नगरसेवक योगेश ससाणे यांनी माहिती मागण्याचा प्रयत्न केला. मात्र, सर्वांनी मिळून त्यांना खाली बसवले.

"Jahirat"

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.