Pune : कोटींच्या वर्गीकरणांना मुख्यसभेची मंजुरी

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या आयुक्तांनी पुढच्या वर्षीचे अंदाजपत्रक स्थायी समिती पुढे मंजुरीसाठी ठेवले आहे. त्यामुळे मागच्या वर्षीच्या अंदाजपत्रकातील नगरसेवकांनी प्रस्तावित केलेल्या कामाच्या वर्गीकरणाचा धडाका सुरु केला आहे. एका तासात 20 कोटी 47 लाख रुपयांची 86 वर्गीकरणे महापालिका मुख्यसभेत सोमवारी मंजूर करण्यात आली.

या वर्गीकरणामध्ये सर्वाधिक निधी ड्रेनेज लाईनची कामे, काँक्रिटीकरण, दवाखाने बांधणे, रस्त्याची कामे करणे, स्टेडियम उभारणे, समाजमंदिर बांधणे, यंत्रसामुग्री घेणे, पाण्याच्या टाक्‍यांची दुरुस्ती, भाजी मंडई बांधणे अशी अनेक कामे सूचवण्यात आली होती. मात्र, यातील सूचवलेली कामे होऊ शकणार नसल्याने त्याचे वर्गीकरण करण्याचे प्रस्ताव सदस्यांनी दिले होते.

आपापल्या प्रभागातील प्रस्ताव सदस्यांनी सभागृहात दिले होते. ते सभेत मान्य करण्यात आले. याशिवाय गल्ली बोळात काँक्रिटीकरण करण्याच्या वर्गीकरणांची संख्या सर्वाधिक आहे. पावसाळा संपून ऑक्‍टोबर महिन्यात निविदा काढण्याची तयारी महापालिका प्रशासनाने सुरू केली आहे. याशिवाय निविदाप्रक्रिया पूर्ण करून जूनपर्यंत ही सगळी कामे पूर्ण होणे आवश्‍यक आहे. तसेच अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने आधीच अंदाजपत्रकात कात्री लागली आहे. असे असताना आहे ती तरतूद बाहेर जाऊ न देता वर्गीकरणाद्वारे निधी प्रभागातच ठेवण्याची धडपड सदस्यांनी सुरू केली आहे. ज्या सदस्यांना अंदाजपत्रकात कमी तरतूद मिळाली आहे. त्यांनीही वर्गीकरणावर भिस्त ठेवली असून, त्याची पळवापळवी होण्याआधी निधी गोळा केला जात आहे.  

हे प्रस्ताव मंजूर झाल्याने या कामांच्या निविदा लगेचच काढून ही कामे आर्थिक वर्ष संपायच्या आत सुरू होण्याची शक्‍यता आहे.

"Jahirat"

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.