Pune : नगर रस्त्यावरील इनॉर्बिट येथील चौकाचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नामकरण

एमपीसी न्यूज- राजमाता अहिल्यादेवी प्रतिष्ठान आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 293 जयंती निमित्त नगर रस्त्यावरील इनॉर्बिट येथील चौकाचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक असे नामकरण मनपा स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाला नगरसेविका मुक्ता जगताप, कर्णे गुरुजी, सुनीताताई गलाडे, राहुल भंडारे, मारूती गलाडे, ज्ञानेश्वर शिंदे, विद्युत समिती सदस्य राजू घूले आदी उपस्थित होते.

यावेळी होळकर चौक ते शिवांजली मंगल कार्यालयापर्यंत अहिल्यादेवीची पालखीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली. ज्येष्ठ विचारवत पुंडलिक लव्हे यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर व्याख्यान दिले. नगरसेविका मुक्ता जगताप, कर्णे गुरुजी, सुनीताताई गलाडे यांनी मनोगत व्यक्त केले.

प्रास्ताविक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश कवडे यांनी केले सूत्रसंचालन आबासाहेब भोसले यानी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवाजी काळे, रमेश सावळकर, सचिन मदने, अरुण चांगूल, पै परमेश्वर बंडगर, बाळू माने यांनी प्रयत्न केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.