Pune : सावरकर यांच्यावर आधारित शनिवारी ‘अनादी मी, अवध्य मी’ कार्यक्रम

एमपीसी न्यूज – सावरकर दर्शन प्रतिष्ठान, मुंबई या संस्थेतर्फे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावर आधारित ‘अनादी मी, अवध्य मी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवारी (दि. 2 जून) पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात सायंकाळी साडेसहा वाजता होणार आहे.

सावरकर दर्शन प्रतिष्ठान ही राष्ट्रवादी विचारांचे संक्रमण करणारी संस्था आहे. या संस्थेची स्थापना ज्येष्ठ संगीतकार सुधीर फडके यांनी 1985 साली केली. ‘अनादी मी, अवध्य मी’ या कार्यक्रमात सावरकरांच्या व्यक्तित्वाचा वेध घेण्यात येणार आहे. कार्यक्रमात मराठी रंगभूमीवरील प्रसिद्ध कलाकार सहभाग घेणार आहेत.

कार्यक्रमाच्या निर्मात्या डॉ. अरुणा ढोरे असून संकल्पना रवींद्र साठे यांची आहे. दिग्दर्शन विनोद पवार, संगीत संयोजन कमलेश भडकमकर यांनी केले आहे. रंगभूषा सुनील देवळेकर यांनी केली आहे. गोपी कुकडे, समीर अन्नारकर, महेंद्र पवार यांनीही कार्यक्रमाच्या विशेष विभागांची जबाबदारी पेलली आहे. प्रमोद पवार, समीरा गुजर, अमोल बावडेकर, नंदेश उमप, केतकी चैतन्य आणि अन्य कलाकारांनी यामध्ये सहभाग घेतला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.