Pune : वेगात धावणाऱ्या लॅम्बोर्गिनीने घेतला निष्पाप श्वानाचा बळी

एमपीसी न्यूज : फर्ग्युसन कॉलेज रस्त्याच्या गुडलक (Pune) चौकामध्ये एका वेगाने धावणाऱ्या लॅम्बोर्गिनीने एका श्वानाला धडक मारल्याची घटना उघडकीस आली आहे. धडक बसल्यावर श्वानाचा जागेवरच मृत्यू झाला आहे. सोमवारी (दि 7) साधारण दुपारी 2 वाजता ही घटना घडली. 

या प्रकरणी डेक्कन जिमखाना पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली. घटनास्थळी हजर असणाऱ्या एका महिलेने ही तक्रार दिली आहे. या घटनेत श्वान जागीच मृत पावला असूनही लॅम्बोर्गिनी चालकाने सुसाट गाडी पळवली असे फिर्यादी महिलेने म्हंटले आहे.

Pimpri : विधान परिषदेला आमचा विचार होईल; सचिन खरात यांची अपेक्षा

तपासादरम्यान, डेक्कन पोलिसांनी आरोपीवर (Pune) कलम 279 (रॅश ड्रायव्हिंग), 429 (प्राण्यांना मारणे किंवा अपंग करणे) यासह कलम 11(1) आणि 11(ए)(एल) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.