Pune : मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल; वैद्यकीय महाविद्यालयात केलेली तोडफोड भोवली

एमपीसी न्यूज : पुण्यातील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय (Pune) महाविद्यालयाचे अधिष्ठाता (डीन) डॉ. आशिष बंगिनवार यांच्या कार्यालयाची तोडफोड मनसे कार्यकर्त्यांनी काल केली होती. याप्रकरणी आता पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अधिक माहितीनुसार, व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश मिळवून देण्यासाठी 20 लाख रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या पुणे महापालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्याला (डीन) लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने (एसीबी) अटक केली होती.

Pune : वेगात धावणाऱ्या लॅम्बोर्गिनीने घेतला निष्पाप श्वानाचा बळी

या संबंधित जाब विचारण्यासाठी मनसेकडून काल महाविद्यालयात आंदोलन करण्यात आले. यावेळी मनसेने त्यांच्या खळखट्याक पद्धतीने आंदोलन करत बंगिनवार यांच्या (Pune) केबिनची तोडफोड केली. या तोडफोडीमध्ये दोन कम्प्युटर आणि खुर्च्यांचे नुकसान झाले

यामुळे मनसेच्या आशिष साबळे, प्रशांत कनोजिया, धनंजय गवळी आणि इतर 5-6 जणांवर सार्वजनिक संपत्तीस हानी पोहचवली म्हणून गुन्हा दखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.