Pimpri : राज्यस्तरीय थायबॉक्सिंग स्पर्धेत एचए शाळेच्या चार खेळाडूंना सुवर्ण

एमपीसी न्यूज – अहमदनगर येथे 18वी राज्यस्तरीय थायबॉक्सिंग (Pimpri) स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेत पिंपरीमधील एच ए प्राथमिक शाळेच्या चार विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक तर दोघांनी रौप्य पदक मिळविले.

अठराव्या राज्यस्तरीय थायबॉक्सिंग स्पर्धेत राज्यातील 280 खेळाडूंनी सहभाग घेतला. यामध्ये पिंपरी येथील याचे प्राथमिक शाळेचे खेळाडू देखील सहभागी झाले होते.

एच ए शाळा आणि डॉ कैलास कदम स्पोर्ट्स क्लबच्या रिद्धी वाळुंज, सिद्धी वाळुंज, कृष्णा भोसले, लोकेश कांबळे या चौघांनी सुवर्णपदक मिळविले तर आरव घेणंघे, कार्तिक देशमुख या दोन खेळाडूंनी रोप्य पदकाची कमाई केली.

Pune : मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल; वैद्यकीय महाविद्यालयात केलेली तोडफोड भोवली

विजय खेळाडूंची हैदराबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सर्व खेळाडूंना मुख्याध्यापिका सुरेखा जाधव, सह (Pimpri) शिक्षिका अर्चना गोरे, डॉ. विठ्ठल मोरे, श्रीयुत स्वामी यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. कराटे शिक्षक किरण माने यांचे खेळाडूंना मार्गदर्शन लाभले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.