Pune : नैराश्यातूनही समाजसेवेची भरारी घेण्याचा आदर्श म्हणजे ‘आपलं घर’

एमपीसी न्यूज – पराकोटीच्या नैराश्यातूनही उंच भरारी कशी घ्यावी (Pune)आणि तीही समाजसेवेसाठी, याचा आदर्श ‘आपलं घर’च्या माध्यमातून विजय आणि साधना फळणीकर यांनी उभा केला आहे. ‘मोबाईल क्लिनिक ऑन व्हील्स’च्या रूपाने आज या सेवाकार्यात नवा अध्याय जोडला गेला आहे, असे गौरवोद्गार प्रसिद्ध चित्रपट-नाट्य अभिनेते भरत जाधव यांनी काढले. ‘आपलं घर’च्या मोबाईल क्लिनिकमुळे दुर्गम गावांत, वाड्या-वस्त्यांवरही रुग्णांना अत्याधुनिक उपाचार आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध होतील, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे, असेही ते म्हणाले.

स्व. वैभव फळणीकर मेमोरियल फाऊंडेशनच्या ‘आपलं घर’च्या (Pune) वतीने ‘आरोग्यम्’ या शीर्षकांतर्गत ‘क्लिनिक ऑन व्हील्स’चे उद्घाटन भरत जाधव यांच्या हस्ते डोणजे येथील संस्थेच्या आवारात संपन्न झाले. त्याचप्रमाणे श्रीमती कौसल्या कराड ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने आयोजित ‘स्तन कर्करोग निदान शिबिरा’चे उद्घाटन ज्येष्ठ सिने अभिनेत्री जयाप्रदा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भरत जाधव यांनी उपस्थितांशी संवाद साधला. ‘आरोग्यम’ उपक्रमासाठी टी – स्सिटीम्स कंपनीचे आर्थिक सहकार्य मिळाले आहे.

Alandi : श्री विजयादशमी निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन

याप्रसंगी प्रसिद्ध उद्योजक चंद्रशेखर शेठ, टी सिस्टीम्सचे व्यवस्थापकीय संचालक अनंत पद्मनाभन, उपाध्यक्ष मिलिंद कौलगुड, चीफ फायनान्स ऑफिसर विनीत पाटील, संचालक प्रसाद सरदेशपांडे व निर्माते – दिग्दर्शक महेश टिळेकर व्यासपीठावर उपस्थित होते.

आरोग्यम् नावाने सुरू करण्यात आलेल्या ‘क्लिनिक ऑन व्हील्स’मध्ये अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा आहेत. सर्व प्रकारचे प्रथमोपचार, नेत्रतपासणी, दंतरोगतपासणी व निदान तसेच उपचार, ओरल कॅन्सर स्क्रिनिंग, ब्रेस्ट कॅन्सर स्क्रिनिंग, डेंटल एक्स रे तसेच जनरल चेकअप कंपार्टमेंटस् आहेत. केमिकल टॉयलेटची सुविधाही त्यामध्ये आहे.

यावेळी बोलताना भरत जाधव म्हणाले, “मी पंढरीच्या विठ्ठल रखुमाई मूर्तीचे दर्शन घेतले आहे. आज मी मानवरूपातील विठ्ठल-रखुमाईचे दर्शन विजय आणि साधना फळणीकर यांच्या रूपाने घेतले. वैयक्तिक आयुष्यातील पराकोटीचे दु:ख, वैफल्य सहन करून, समाजसेवेचा वसा त्यांनी कर्तव्यभावना आणि अखंड परिश्रमातून चालवला आहे. नैराश्यातून त्यानी ही भरारी समाजसेवेसाठी घेतली आहे. या वास्तूत सकारात्मक उर्जेचा अनुभव येतो. नावाप्रमाणेच अतिशय आपलेपणाने, गोडव्याने इथले कार्य सुरू आहे, हे मला महत्त्वाचे वाटते.”

‘आपलं घर’मधील रसिकांसाठी यापुढे माझ्या पुण्यातील प्रयोगातील दहा तिकिटे राखीव ठेवली जातील, अशी घोषणा अभिनेते भरत जाधव यांनी आपल्या मनोगतात केली. त्यांच्या या घोषणेला टाळ्यांच्या कडकडाटाने उपस्थितांनी प्रतिसाद दिला. मी अभिनेता आहे, कलाकार आहे, त्या माध्यमातून इथल्या मंडळींच्या चेहेऱ्यावर हसू फुलवता आलं तर मला सर्वाधिक समाधान मिळेल, असेही ते म्हणाले.

अभिनेत्री जयाप्रदा यांनी ‘आपलं घर’च्या उपक्रमांचा गौरव करताना ग्रामीण भागात आरोग्यसेवा देणाऱ्या उपक्रमांचा उल्लेख केला. “गरजू, उपेक्षित रुग्णांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, ज्येष्ठांसाठी खरोखरीच ही संस्था आधार देते. तुम्ही एकटे नाही, आम्ही सर्व सोबत आहोत, हा दिलासा देते”, असे त्या म्हणाल्या.

आपल्याकडे महिला स्वत:च्या आजारांविषयी उघड बोलत नाहीत. संकोचाने लपवतात. अशा महिलांसाठी संस्थेची आरोग्य शिबिरे मदत करणारी ठरतील. आरोग्यम उपक्रमामुळे गरीब, गरजू रुग्णांना वैद्यकीय सेवासुविधा त्यांच्या घरापर्यंत मिळतील. त्यांना डॉक्टरांकडे येण्याची गरज नसून, डॉक्टरच त्यांच्यापर्यंत जातील, असेही त्यांनी सांगितले.

मनोगतात विजय फळणीकर यांनी संस्थेच्या कार्याची सुरवात आणि वाटचालीची थोडक्यात माहिती सांगितली. चंद्रशेखर सेठ, महेश टिळेकर यांनीही मनोगत मांडले. टी सिस्टीम्सच्या वतीने मिलिंद कौलगुड यांनी सीएसआर उपक्रमांची माहिती दिली. मान्यवरांचे स्वागतपर सत्कार विजय फळणीकर यांनी केले. राजेश मंडलिक यांनी सूत्रसंचालन केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.