Talegaon Dabhade : राष्ट्रीय श्रमिक आघाडीचा जनरल मोटर्स कामगारांच्या आंदोलनाला पाठिंबा

एमपीसी न्यूज – जनरल मोटर्सच्या एक हजार पेक्षा जास्त कामगारांनी मागील दोन (Talegaon Dabhade) आठवड्यांपासून साखळी उपोषण सुरू केले आहे. या उपोषण आंदोलनाला राष्ट्रीय श्रमिक आघाडीने आज (रविवारी, दि. 22) पाठिंबा दिला. राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष यशवंत भोसले यांनी उपोषण स्थळी भेट देऊन पाठिंबा जाहीर केला.

शंभरपेक्षा जास्त कामगार असलेल्या कंपन्यांना बंद करण्यासाठी असलेल्या कायदेशीर नियमांची दखल न घेता येथील जनरल मोटर्स इंडिया कंपनीला सरकारने क्लोजर रिपोर्ट द्यावा, ही बाब पटण्यासारखी नाही. त्यामुळे आज सुमारे एक हजारावर कामगार आणि कुटुंबियांच्या रोजगारावर गंडांतर आले आहे. राज्य शासनाने हा क्लोजर रिपोर्ट रद्दबातल केल्यास कामगारांच्या संघर्षमय रोजगाराचा मार्ग मोकळा होईल, असे यशवंत भोसले म्हणाले.

Pune : नैराश्यातूनही समाजसेवेची भरारी घेण्याचा आदर्श म्हणजे ‘आपलं घर’

यावेळी त्यांच्यासोबत उपोषणकर्त्या कामगारांना पाठींबा (Talegaon Dabhade)देण्यासाठी एसकेएफ कंपनी कामगार युनियन प्रतिनिधी स्वानंद राजपाठक, राखी ट्रान्सपोर्टचे युनियन प्रतिनिधी सतीश एरंडे, दीपक पाटील, चाकण येथील डायचॅन कंपनी युनियन कामगार प्रतिनिधी शेखर पाटील, लोकमान्य हॉस्पिटल कामगार प्रतिनिधी आणि राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे नेते अमोल घोरपडे, प्लास्टिक ओमिनियम एम्प्लॉयीज् युनियनचे उपाध्यक्ष आबासाहेब खराडे, सीएचपीएलचे प्रतिनिधी आदि उपस्थित होते.

दरम्यान, जनरल मोटर्स कंपनीच्या उपोषणकर्त्या कामगारांच्या लढ्याला राष्ट्रीय श्रमिक आघाडीतर्फे पाठींबा देण्यासाठी यशवंत भोसले यांनी रविवारी (ता.२२) उपोषण स्थळास भेट दिली.

त्यावेळी झालेल्या सभेत बोलताना ते म्हणाले, की जनरल मोटर्स इंडिया कंपनी कामगारांना मुख्यमंत्री, राज्य सरकार आणि विरोधी पक्षांचा जाहीर पाठिंबा मिळालेला असूनही उपोषणाच्या 21 व्या दिवसापर्यंत त्यावर तोडगा का निघत नाही, याचा विचार केला पाहिजे. उपोषणकर्त्या कामगार नेत्यांनी या लढ्याचे सिंहावलोकन करून कामगार आयुक्तांनी बेकायदेशीरपणे केलेल्या कंपनी क्लोजर रिपोर्टला रद्दबातल करण्यासाठी राजकीय नेत्यांना सोबत घेऊन दबाव टाकण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

 

जनरल मोटर्स इंडिया युनियनचे अध्यक्ष संदीप भेगडे यांनी प्रास्ताविकात कामगारांच्या मागण्या आणि त्याबाबत सुरु असलेल्या लढ्याची माहिती दिली.

कामगारांना उद्देशून भोसले पुढे म्हणाले की, सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांसह स्थानिक आमदार, खासदार, माजी राज्यमंत्री यांनी तुम्हाला पाठींबा दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पाठींबा म्हणजे राज्य सरकारचाही पाठींबा आहे. असे असूनही गेले तीन आठवडे कामगार रस्त्यावरच का आहेत.

 

यातून तातडीने न्याय मिळवण्यासाठी कायद्याचा मार्ग ठोस असल्याने सर्वप्रथम कंपनीच्या क्लोजर रिपोर्टला आक्षेप घेत नव्याने सुनावणी करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. पाठींबा दिलेल्या सर्व राजकीय नेत्यांना सोबत घेऊन याकामी कामगार आयुक्तांशी चर्चा करण्याचा सल्ला त्यांनी दिला.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.