Pune : ॲड. प्रार्थना सदावर्ते व सरस्वती काळे यांना स्वयंसिद्धा पुरस्कार जाहीर

एमपीसी न्यूज – स्वंयसिद्धा प्रतिष्ठान यांच्यातर्फे (Pune) देण्यात येणारा स्वसंसिद्धा पुरस्कार ॲड. प्रार्थना सदावर्ते व सरस्वती काळे यांना जाहीर झाला असून हा पुरस्कार प्रदान सोहळा शनिवारी (दि.17) सायंकाळी पाच वाजता निगडीतील सावरकर भवन येथे पार पडणार आहे.

Talegaon Dabhade : ज्येष्ठ कलाकार प्रभा शिवणेकर व वसंत अवसरीकर यांना जीवनगौरव पुरस्कार

स्वयंसिद्धा पुरस्काराचे यंदाचे हे सहावे वर्ष आहे. ॲड. प्रार्थना सदावर्ते (कौटुंबीक समुपदेशिका), सरस्वती काळे (पोलीस कॉन्स्टेबल) या पुरस्काराच्या मानकरी आहेत. तसेच, या कार्यक्रमात, ‘स्वातंत्र्य लढ्यातील साहित्यिकांचे योगदान’ विषयावरील परिसंवादाचे आयोजन केले आहे. अंजली कुलकर्णी (ज्येष्ठ साहित्यिका), राजेंद्र घावटे (व्याख्याते, निवेदक), डॉ. धनंजय भिसे (लेखक, सामाजिक कार्यकर्ते) इत्यादी मान्यवर मंडळी परिसंवादाचे वक्ते आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष  प्रा. तुकाराम पाटील (जेष्ठ साहित्यिक), कार्यक्रमाचे प्रमुख (Pune)पाहुणे पुरुषोत्तम सदाफुले (ज्येष्ठ साहित्यिक) ही मान्यवर मंडळी आहेत. अशी माहिती संस्थेच्या अध्यक्षा सविता इंगळे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.