Pune :पुण्यात बागेश्वरधाम बाबाच्या कार्यक्रमाचे भाजप कडून आजोजन ;राष्ट्रवादीचा विरोध

एमपीसी न्यूज: भाजपचे पुण्याचे माजी आमदार जगदीश मुळीक (Pune)यांनी बागेश्वर बाबांच्या सत्संगाचे आयोजन केले आहे .

पुण्यातील संगमवाडी येथे 20,21,22 या दिवशी हा कार्यक्रम होणार आहे . बागेश्वर बाबांच्या या कार्यक्रमाला अजित पवार गटाने विरोध केला आहे. बागेश्वर बाबांनी संत तुकाराम महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होत . त्यामुळे राष्ट्रवादी काँगेस चे राज्याचे सोशल मीडिया प्रमुख सुदर्शन जगदाळे यांनी या कार्यक्रमास विरोध केला आहे.

Chinchwad : मनोज जरांगे पाटील यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर नगर रस्त्याकडे जाणारी वाहतूक वळवली

भाजप कडून या सत्संगाची जोरदार तयारी करण्यात येत आहे . या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजेरी लावणार असल्याची माहिती आजोजकांकडून देण्यात आली आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.