Today’s Horoscope 18 November 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज – आजचे पंचांग – Today’s Horoscope 18 November 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग-
आजचा दिवस – शनिवार.

तारीख – 18.11.2023.

शुभाशुभ विचार- चांगला दिवस.

आज विशेष – पांडव पंचमी.

राहू काळ – सकाळी 9.०० ते 10.30.

दिशा शूल – पूर्वेस असेल.

आज नक्षत्र – उत्तरा शाढा.

चंद्र राशी – धनु 7.01 पर्यंत नंतर मकर.
—————————–
मेष – ( शुभ रंग – राखाडी)
आज आपले कर्तव्य सोडल्यास इतर गोष्टी तुमच्यासाठी कमी महत्त्वाच्या असतील. नोकरदारांना वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल. मित्रमंडळींना आज दुरूनच राम राम करा.

वृषभ ( शुभ रंग- हिरवा)
नोकरीच्या ठिकाणी असलेले नियम मोडून चालणार नाहीत. वरिष्ठांना खुश करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागेल. मनःशांतीसाठी आज सत्संगा शिवाय दुसरा पर्याय नाही.

मिथुन – ( शुभ रंग- पिस्ता)
आज आपल्या मर्यादित राहिलेले बरे. धाडसाची कामे आज शक्यतो टाळा. सासुरवाडीकडून एखादा लाभ होऊ शकतो. वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या मताने घ्या.

कर्क – ( शुभ रंग – पांढरा)
भागीदारीच्या व्यवसायात देण्या घेण्याचे व्यवहार लिखित स्वरूपात ठेवा. वैवाहिक जीवनात काही जुन्या आठवणी मनाला आनंद देतील. तुमच्या प्रवासात काही वेळ खोळंबा संभवतो.

सिंह -( शुभ रंग – मरून)
ध्येयप्राप्तीसाठी तुमचे अथक परिश्रम चालू असून तब्येतीकडे मात्र तुमचे दुर्लक्ष होत आहे. आज तुम्हाला विश्रांतीची गरज भासेल. विद्यार्थ्यांना स्पर्धेत यश मिळेल.

कन्या – ( शुभ रंग- निळा)
उच्च शिक्षण घेणाऱ्यांच्या महत्त्वकांक्षा वाढतील. विद्यार्थी पालकांच्या अपेक्षा पूर्ण करतील. आज सहकुटुंब एखाद्या मनोरंजनाच्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्याल. छान दिवस.

तूळ ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
आज तुमच्यासाठी गृह सौख्याचा दिवस. कुठेही न जाता घरी आराम करावासा वाटेल. गृहिणी आज घर स्वच्छतेचे मनावरच घेतील. मुलांच्या शिस्तीस प्राधान्य देणे गरजेचे आहे.

वृश्चिक ( शुभरंग – जांभळा)
प्रॉपर्टी विषयीचे मोठे आर्थिक व्यवहार टाळा. आज प्रवासात काही नवी नाती जुळून येतील. आज काही अति हुशार मंडळी ही संपर्कात येणार आहेत. डोके शांत ठेवणे आवश्यक आहे.

धनु (शुभ रंग- आकाशी)
आज तुमची आर्थिक बाजू भक्कम असेल. मृदू वाणीने विरोधकांनाही तुम्ही आज आपलेसे कराल. नेत्यांची वक्तव्ये जनमानसांवर प्रभाव टाकतील. आज आशादायी दिवस आहे.

मकर (शुभ रंग- लाल)
आज कुठेही आपलेच खरे करण्याचा तुमचा प्रयत्न राहील. काही क्षुल्लक गोष्टींवरून तुम्हाला राग येईल. महत्त्वाच्या चर्चेत आपलेच घोडे पुढे दामटवाल.

कुंभ – (शुभ रंग- मोतिया)
अधिकारी वर्गाला कार्यालयीन कामासाठी प्रवास करावे लागतील. बेरोजगारांना घरापासून लांब नोकरीच्या संधी येतील. आज दुकानदारांनी उधारी उसनवारी टाळावी.

मीन ( शुभ रंग- सोनेरी)
आनंदी व उत्साही असा आजचा दिवस असून काही दुरावलेली नाती जवळ येतील. काही भाग्यवान मंडळींना नव्या घराचा ताबा मिळेल. तुमची अपुरी स्वप्ने साकार होतील.

श्री जयंत कुळकर्णी.
ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार.
फोन 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.