Pune : मोठी बातमी! ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी तपास अधिकारी बदलले

एमपीसी न्यूज : ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात पुणे (Pune) पोलिसांपासून ते बड्या नेत्यांवर उलट सुलट आरोप होत असताना आता मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास आता गुन्हे शाखेचे सुनील थोपटे यांच्याकडून पोलीस आयुक्त सुनील तांबे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. सुनील तांबे यांचा अनुभव लक्षात घेता हा बदल करण्यात आल्याचे पुणे पोलीस आयुक्तांनी सांगितले आहे. 

नेपाळला पलायन करत असताना ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील मात्र पोलिसांच्या हाती लागला. परंतु, ललित नेपाळला जाण्यात यशस्वी ठरल्याची शक्यता आहे.

ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील आणि त्याचा साथीदार (Pune) अभिषेक बलकवडे यांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने नेपाळ सीमेवर अटक केली.

भुषण पाटीलची अधिक तपासणी केली असता भूषण नाशिक येथे एमआयडीसीमधील कारखान्यात मेफेड्रॉन तयार करत असल्याचे समोर आले.

Mumbai : भारत 2026 च्या ऑलिम्पिकसाठी सज्ज – पंतप्रधान नरेंद्र मोदी

त्या ठिकाणचा पंचनामा पोलिसांकडून करण्यासाठी पुणे पोलिसांनी भूषणला नाशिक येथे नेले आहे. या सोबतच भुषण पाटीलला त्याच्या घरी नेऊनदेखील त्याची चौकशी करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.