Navratri 2023 : भक्तिमय वातावरणात नवरात्र उत्सवाला सुरुवात; शहरात भक्तिभावाने झाली देवीची प्राणप्रतिष्ठापना

एमपीसी न्यूज – नारीशक्तीचे प्रतीक असलेल्या दुर्गा उत्सवाला (Navratri 2023) काल सुरुवात झाली असून शहरात सर्वत्र घटस्थापने नंतर देवीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे. ढोल ताशाच्या गजरात भंडाऱ्याची उधळण करत मिरवणुकीद्वारे दुर्गा मातेचे आगमन झाले.

पहिल्याच दिवशी देवीचे दर्शन घेण्यासाठी विविध ठिकाणी आबालवृद्धसह महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. संकटाचे तिमिर दूर सारण्यासाठी पुढील नऊ दिवस अखंड दीप प्रज्वलन करून हा दीपोत्सव साजरा केला जाणार आहे.

Pune : मोठी बातमी! ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी तपास अधिकारी बदलले

दांडिया, गरबा अशा आरोग्यवर्धक नृत्यांनी सर्वत्र उत्सवाचे वातावरण (Navratri 2023)निर्माण होऊन दुःखाचे सावट दूर होणार असून नऊ दिवस नवरंगी वस्त्र परिधान करून जीवनात भक्ती, चैतन्य, उत्साह यांचे रंग भरले जातील.

अनेक मित्र मंडळांनी दुर्गा उत्सवाच्या अनुषंगाने विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. अन्नदान, रक्तदान, आरोग्य शिबीर, महिलांसाठी खास खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

घटस्थापना व नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने बाजारात झेंडू सह विविध फुलांची आवक झाल्याने बाजारालाही बहर आली आहे. ठिकठिकाणी दुकानांमध्ये सजावटीच्या वस्तू, साधने यांची मोठ्या प्रमाणात विक्री सुरू आहे.

बाजारात रंगीबेरंगी लाकडांपासून तयार केलेल्या दांडिया मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. यावेळी कापड बाजारातही लोकांची मोठी गर्दी होती. रविवार आणि घटस्थापना एकाच दिवशी आल्याने पाहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने लोक या उत्सवात सहभागी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.