Pune : मोठी बातमी! ड्रग्ज रॅकेटचा म्होरक्या ललित पाटील पलायन प्रकरणी 9 पोलिसांचे निलंबन

एमपीसी न्यूज : ससून रुग्णालयातील ड्रग्ज रॅकेटचा (Pune) म्होरक्या ललित पाटील पोलिसांच्या ताब्यातून पळाल्याने 9 पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. मोठ्या गुन्हेगाराच्या बाबतीत बेजबाबदार आणि गैरवर्तणूक  केल्याप्रकरणी ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.  

या प्रकरणी  PSI जनार्दन काळे, PC विशाल ठोपले, स्वप्नील शिंदे, दिगंबर चंदनशिव, PSI मोहिनी डोंगरे, हवालदार आदेश शिवणकर, पोलिस नाईक नाथाराम काळे, शिपाई पिरप्पा बनसोडे, शिपाई आमित जाधव यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

Alandi : कमी कालावधीत चांगले नाव कमवणारी प्रेरणा बँक – दिलीप वळसे पाटील

गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने रविवारी ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर सापळा रचून तब्बल दोन कोटी रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त केले होते. ललित पाटीलचे मोठे (Pune) ड्रग्ज रॅकेटच उघडकीस आले असते मात्र तो पळून गेल्यामुळे मोठ्या कारवाईला मुकावे लागले. यामुळे 9 पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.