Pune : पुण्यात भरणार स्मिता मेलिनकेरी यांच्या कलात्मक छायाचित्रांचे एकल प्रदर्शन

एमपीसी न्यूज : गेली तीस वर्षे छायाचित्रण क्षेत्रात कार्यरत असलेल्या स्मिता मेलिनकेरी यांचे त्यांनी टिपलेल्या कलात्मक छायाचित्रांचे एकल प्रदर्शन (Solo Exhibition) दिनांक 10 ऑटोबरपासून पुण्यातील राजा रवी वर्मा आर्ट गॅलरी येथे भरणार आहे. हे प्रदर्शन 10 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर पर्यंत सर्वांसाठी खुले असणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन मंगळवार 10 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5.30 वाजता होणार आहे. 

स्मिता मेलिनकेरी या छायाचित्रण क्षेत्रात गेल्या 30 वर्षांपासून कार्यरत आहेत.  त्या इमेज प्रोसेसिंगचा वापर करून कलानिर्मिति करत आहेत. फोटो क्लिक करण्यापासून फिल्म प्रोसेस करण्यापर्यंत पूर्ण प्रक्रियेची त्यांनी स्वतः हाताळणी केल्यामुळे त्यांची जिज्ञासा वाढीस लागली.

25 वर्षे त्यांनी कम्युनिकेशन डिज़ाइनचा व्यवसाय केल्यावर इमेज प्रोसेसिंग सॉफ्टवेअरवरील हातखंडा पुढे त्यांना त्यांच्या कलानिर्मितीत उपयोगास आला. फक्त सुंदर चित्रे तयार करण्यापलीकडे जाऊन मनाचा ठाव घेणारी व बघणाऱ्याला अंतर्मुख करणारी चित्रनिर्मिती ही त्यांची खासियत. कधी कधी अगदी साध्या तर कधी क्लिष्ट विषयाला हात घालून वर्षानुवर्षे चिकाटीने त्या चित्र निर्मिती करत आल्या आहेत.

स्मिता मेलिनकेरी

 

Pune : मोठी बातमी! ड्रग्ज रॅकेटचा म्होरक्या ललित पाटील पलायन प्रकरणी 9 पोलिसांचे निलंबन

एका बाजूला काशी, पुणे, राजस्थान अशी भौगोलिक दृष्ट्या अतिशय भिन्न ठिकाणं, तिथलं समाज जीवन, तर दुसरीकडे गवत, झाडी, कमळ अशी निसर्गाची रूपंही त्यांनी कल्पकतेने हाताळली आहेत. स्केल आणि छपाईच्या वेगळ्या तंत्रामुळे चित्रांची परिणामकारकता अजून वाढली आहे.

रसिकांनी या प्रदर्शनास भेट देऊन कलास्वादाचा आनंद घ्यावा, असे आवाहन स्मिता यांनी केले आहे.

‘अपर्चर स्टोरी ‘ –
स्मिता मेलिनकेरींच्या फोटोग्राफीचे एकल प्रदर्शन

प्रदर्शन ठिकाण – राजा रवी वर्मा आर्ट गॅलरी, पुणे
वेळ – सकाळी 11 ते संध्याकाळी 7 पर्यंत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.