Pune Crime : बंडगार्डन परिसरातील बार व क्लबवर पोलिसांचा छापा

एमपीसी न्यूज – पुण्यातील बंडगार्डन (Pune Crime) परिसरात रात्री उशिरापर्यंत मोठ्या आवाजात डिजे सिस्टिम लावून ध्वनी प्रदुषण करणाऱ्या ‘One8 कम्यून बार’ (One 8 व ‘मिलर्स लक्झरी क्लब’वर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई पुणे शहर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने शनिवारी (दि.19) केली.

सामाजिक सुरक्षा विभागाचे पथक बंडगार्डन परिसरातील राजा बहादुर मिल येथील ‘One8 कम्यून बार’ व ‘मिलर्स लक्झरी क्लब’ येथे मोठ्या आवाजात सांउड सिस्टिमवर संगीत वाजवले जात असल्याची गोपनीय माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला मिळाली. व त्या ठिकाणी छापा टाकला असता मोठ्या आवाजात संगीत सुरु असल्याचे आढळून आले. पोलिसांनी दोन्ही हॉटेलमधील एक लाख 70 हजार रुपये किंमतीचे सांउड सिस्टिम जप्त केले आहे. पोलिसांनी हॉटेलवर पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत ध्वनी प्रदुषण अधिनियमानुसार कारवाई केली. जप्त केलेला मुद्देमाल बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आली आहे.

Chikhali News : ब्लॅकमेल करत महिलेवर चार वर्ष लैंगिक अत्याचार

ही कारवाई पोलीस (Pune Crime) आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत, बाब कर्पे, मनिषा पुकाळे, इरफान पठाण, संदीप कोळगे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.