Pune : ‘बाबूजी आणि मी’ संगीत कार्यक्रमाला पुणेकरांची गर्दी

एमपीसी न्यूज़ – श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे (Pune) गणपती मंदिराच्या 39 व्या वर्धापनदिना निमित्त गणेश कला क्रीडा मंच येथे संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाच्या पहिले दोन दिवस विविधकार्यक्रमांनंतर तिस-या दिवशी प्रख्यात गायक श्रीधर फडके व सहका-यांनी ‘बाबूजी आणि मी’ हा कार्यक्रम सादर केला.

 

देवत्वाचा अर्थ सहज सोप्या भाषेत मांडणारे गदिमा यांची ‘देव देव्हाऱ्यात नाही देव नाही…’ या भक्ती गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर ज्ञानेश्वर माऊलींची श्रीधर फडके ह्यांनी संगीतबद्ध केलेली रचना ‘देवाचिये द्वारी उभा क्षणभरी’ या गीताने वातावरण भक्तिमय केले.

 

बाबूजींची हिंदी रचना असलेले लता मंगेशकर यांच्या आवाजात प्रसिद्ध गीत ‘ज्योती कलश छलके’ हे गीत सादर झाले. श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेली समर्थ रामदास यांची रचना ‘माई मोरे नैनं श्याम सुरंग’ हे रामाशी एकरूप करणा-या रचनेला रसिकांनी भरभरून दाद दिली. यानंतर सुधीर मोघे यांनी लिहिलेले राम फाटक यांनी संगीतबद्ध केलेले ‘सखी मंद झाल्या तारका’ हे गीत कलाकारांनी (Pune) सादर करून श्रोत्यांची मने जिंकली.

Bavdhan : महिलेवर लैगिंक अत्याचार करत केली 17 लाखांची फसणूक

 

संगीत महोत्सव दि. 30 मार्चपर्यंत होणार असून यावर्षी पुण्यासह देशभरातील दिग्गज कलाकारांचे सादरीकरण हे महोत्सवाचे वैशिष्टय आहे. गणेश कला क्रीडा मंच येथे दररोज सायंकाळी 7 ते 10 या वेळेत हे दिग्गज कलाकार आपली कला सादर करणार आहेत. महोत्सव रसिकांसाठी विनामूल्य खुला असून पुणेकरांनी मोठया संख्येने महोत्सवात सहभागी होताना दिसत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.