Bavdhan : महिलेवर लैगिंक अत्याचार करत केली 17 लाखांची फसणूक

एमपीसी न्यूज – महिलेवर लैगिंक अत्याचार करत तिची 17 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. हा प्रकार 2017 ते 22 मार्च 2023 या कालावधीत बावधन (Bavdhan) येथे घडला आहे.

 

महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून विजयसिंग सुजभानसिंग तंवर (वय 30, रा.बावधन, मुळ राजस्थान) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Pimpri News : वायसीएम रुग्णालयात नवीन लाँड्री मशीन बसवण्याची निविदा रद्द करा – अश्विनी जगताप.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नाचे आमिष (Bavdhan) दाखवून पिडीतेशी शारिरीक संबंध ठेवले. तसेच पैशांची गरज आहे म्हणत पिडीतेचा विश्वास संपादन करत रोख साडे बारा लाख व ऑनलाईन पद्धतीने 4 लाख 77 हजार 630 रुपये असा एकूण 17 लाख 27 हजार 630 रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. यावरून हिंजवडी पोलिसांनी तक्रार दाखल केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.