Pune : ‘एनडीए’त प्रशिक्षण घेणारा महाराष्ट्रातील कॅडेट प्रथम महालेचा मृत्यू

बॉक्सिंग स्पर्धेदरम्यान दोन दिवसांपूर्वी डोक्याला झाली होती गंभीर दुखापत

एमपीसी न्यूज – बॉक्सिंग स्पर्धेत डोक्याला दुखापत झालेला (Pune) एनडीएच्या कॅडेटचा पुण्याच्या कमांड हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. त्याला आंतरस्क्वाड्रन बॉक्सिंग स्पर्धे दरम्यान दुखापत झाली होती. दुखापतीनंतर दोन दिवसांनी बुधवारी त्याचा मृत्यू झाला.

प्रथम महाले 2021  मध्ये एनडीएमध्ये दाखल झाला होता. एनडीएतील 145 व्या तुकडीचा छात्र होता .16 ऑक्टोबर रोजी आंतरस्क्वाड्रन बॉक्सिंग स्पर्धेत भाग घेत असताना त्याच्या डोक्याला दुखापत झाली.

Dehuroad : क्रिकेट सामन्याच्या पार्श्वभूमीवर देहूरोड परिसरातील वाहतुकीत बदल

डोक्यातून अंतर्गत रक्तस्राव झाल्यानंतर त्याच्यावर पुण्यातील कमांड हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली. 18 ऑक्टोबर रोजी पहाटे 5 वाजता त्याचा मृत्यू झाला. एनडीएने प्रसिद्धी पत्रक काढून ही माहिती दिली.

या कॅडेटच्या पार्थिवाला खडकवासल्याच्या राष्ट्रीय संरक्षण अकादमीत पूर्ण सैनिकी सन्मान देण्यात आला. यावेळी राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे कमांडंट व्हाइस अॅडमिरल अजय कोयर यांनी पुष्पहार अर्पण केला.

हा तरुण 2019 मध्ये सातारा सैनिक स्कूल मधून उत्तीर्ण झाला होता. तो मूळचा जळगाव जिल्ह्यातील सायगाव (मांदुर्ण) गावचा रहिवासी होता. त्याच्या पार्थिवावर गुरुवारी अत्यसंस्कार करण्यात येणार(Pune) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.