Pune: कोथरुड येथे दिव्यांग मतदार जन जागृती यात्रा संपन्न

एमपीसी न्यूज – कोथरूड विधानसभा मतदारसंघात छत्रपती शिवाजी महाराज स्मारक( Pune)ते अंध मुलींच्या शाळेदरम्यान दिव्यांग मतदार जनजागृती यात्रा आयोजित करण्यात आली होती. यावेळी दि पूना ब्लाइंड स्कूलच्या विद्यार्थिनींनी पथनाट्याद्वारे मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले. 
आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्यावेळी अधिकाधिक(Pune) मतदानाद्वारे मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघ यांच्या संयुक्त विद्यमाने विविध घटकांसाठी मतदार जागृती अभियान राबविले जात असून याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
यावेळी स्वीप समन्वयक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अर्चना तांबे, कोथरूड विधानसभेच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा पवार, जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्रवीण कोरगंटीवार, प्रशासकीय अधिकारी तथा पूर्णवेळ सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी सुरेश उचाळे, पुणे महानगरपालिकेचे मुख्य समाज विकास अधिकारी रामदास चव्हाण, नायब तहसीलदार स्वप्निल खोल्लम आदी उपस्थित होते.

अर्चना तांबे म्हणाल्या, मतदान हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. या रॅलीच्या माध्यमातून दिव्यांगांच्या सामाजिकरणासाठी उचललेले हे एक सकारात्मक पाऊल आहे. दिव्यांग विद्यार्थीनी इतक्या हिरीरीने या प्रक्रियेत भाग घेत असून यापासून सर्व मतदारांनी प्रेरणा घ्यावी. मतदानाच्यावेळी कोणत्याही अमिषाला बळी न पडता निर्भयपणे मतदान करावे व लोकशाही सुदृढ करण्यात हातभार लावावा, असे आवाहन त्यांनी केले.  पवार म्हणाल्या, आगामी निवडणुकीत सर्व मतदारांनी मतदान करावे. दिव्यांग हे सक्षमपणे काम करू शकतात हे दाखविण्यासाठी दिव्यांग मतदान केंद्र उभारण्यात येणार आहे.
कोरगंटीवार म्हणाले, समाज कल्याण विभागामार्फत सर्व दिव्यांग मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे.
यावेळी प्रत्यक्ष ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्रावर मतदानाच्या प्रात्यक्षिकाचा सुमारे 50 दिव्यांग व्यक्तींना लाभ घेतला. तसेच उपस्थितांनी मतदानाची शपथ घेतली.
शाळेच्या मुख्याध्यापक दामोदर सरगम, अंध मुलींच्या व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र कार्यशाळा संचालक राजू नंदाल, कोथरूड मतदार दिव्यांग समन्वय अधिकारी सविता वाघमारे, विजय पाटोळे, महेश टेमगिरे, अप्पा गुंडाळ, सुनंदा बामणे, अमोल शिंगारे आदी उपस्थित होते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.