Pune : एकनाथ खडसे यांना अंतरिम जामीन मंजूर

एमपीसी न्यूज : भोसरी भूखंड गैरव्यवहार प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात (Pune)आलेले तत्कालीन मंत्री एकनाथ खडसे यांना न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला.

भोसरी भूखंड गैरव्यवहार प्रकरणात एकनाथ खडसे (Pune )यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात खडसे यांच्याविरुद्ध लातूर प्रतिबंधक विभागाने आरोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणात अंतरिम जामीन मिळावा म्हणून खडसे यांनी विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांच्या न्यायालयात अर्ज दाखल केला होता.

Alandi : वारकऱ्यांना धुळीचा त्रास होऊ नये यासाठी डस्ट मशिनद्वारे फवारणी तर शहरातील महत्वाच्या 120 ठिकाणी सीसीटीव्ही

विशेष न्यायाधीश जाधव यांनी खडसे यांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे . या प्रकरणात जामीन मिळविण्यासाठी खडसे यांनी बुधवारी (दि. 6) विशेष न्यायालयात अर्ज दाखल केला. खडसे यांच्या जामीन अर्जावर 3 जानेवारी 2024 रोजी सुनावणी होणार आहे, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

भूखंड गैरव्यवहार प्रकरणात खडसेंविरोधात दाखल गुन्ह्यात त्यांनी अंतरिम जामिनासाठी अर्ज केला होता. लातूर लाचलुचपत प्रतिबंध विभागाने दाखल केलेल्या आरोपपत्रानंतर त्यांनी अर्ज केला. पुढे होणाऱ्या सुनावणीकडे आता लक्ष लागले आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.